शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कार्यकर्ता प्रशिक्षणाची प्रत्येक पक्षात गरज : गिरीश बापट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 17:36 IST

धनंजय थोरात स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळा एस.एम.जोशी सभागृहात पार पडला. त्यावेळी गिरीश बापट बाेलत हाेते.

पुणे : राजकीय पक्ष ही व्यक्तींची नाही, तर विचारांची लढाई असते, हे आपण विसरत चाललो आहोत. धनंजय थोरात हे सगळ्यांशी एकरुप होणारे आणि कार्यकर्ता कसा असावा, हे सांगणारे दिलखुलास व्यक्तिमत्त्व होते. सध्या पक्षांतर्गत राजकीय अस्थिरता वाढत असून कार्यकर्ता कसा असावा, याचे प्रत्येक पक्षामध्ये प्रशिक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. 

    धनंजय थोरात स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळा एस.एम.जोशी सभागृहात पार पडला. यावेळी ज्येष्ठ संगीतकार पं. ह्रदयनाथ मंगेशकर, माजी आमदार मोहन जोशी, उल्हास पवार, रामदास फुटाणे, शिरीष बोधनी, बिपीन गुपचुप, डॉ.विकास आबनावे, धनंजय थोरात यांच्या पत्नी शुभांगी थोरात यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अहमदनगर जिल्हयातील डॉ.राजेंद्र धामणे आणि डॉ.सुचेता धामणे यांना मुख्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. अरुण काकतकर, समाजसेवक प्रदीप लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते शिरीष मोहिते यांना देखील सन्मानित करण्यात आले. अरुण काकतकर यांनी पुरस्काराची रक्कम डॉ.धामणे यांच्या संस्थेला आणि शिरीष मोहिते यांनी लुई ब्रेल अंध अपंग संस्थेला दिली.     

     ह्रदयनाथ मंगेशकर म्हणाले, ‘धनंजय थोरात काँग्रेसचे होते आणि नगरसेवक होते हे मला ठाऊक नव्हते. पण, ‘भावसरगम’चे चाहते म्हणून माझा त्यांच्याशी परिचय होता. करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी लतादीदीला स्वरमाऊली ही पदवी दिली आहे. या स्वरमाऊलीच्या वाढदिवसानिमित्त मी माऊली प्रतिष्ठानला एक लाख रुपयांची देणगी जाहीर करतो.’ 

    मोहन जोशी म्हणाले, समाजात अनेक कार्यकर्ते आहेत, ज्यांच्या कामाची दखल घेतली जात नाही. समाजामध्ये त्यांना व्यासपीठ दिले गेले नाही, अशांची निवड प्रतिष्ठानतर्फे केली जाते. त्यांचे काम समाजापर्यंत पोहोचवून त्यातून समाजात प्रेरणा निर्माण व्हावी, हा त्यामागील हेतू आहे, असेही त्यांनी सांगितले. 

बालचित्रवाणीतील ठेवा डिजीटाईज करा बंद पडलेले दुकान असे म्हणून जी बालचित्रवाणी बंद झाली. त्याकरीता मी अनेकदा पत्रव्यवहार देखील केला आहे. बंद पडलेल्या या दुकानात कोण कोण होते, त्या ५०० लोकांची यादी देखील मी बालभारतीकडे दिली आहे. त्यात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे देखील आहेत. ते चित्रीकरण ताबडतोब डिजीटाईज करा. जेणेकरुन हा सांस्कृतिक अमूल्य ठेवा पुढच्या पिढीसमोर ठेवता येईल, अशी मागणी अरुण काकतकर यांनी गिरीष बापट यांच्याकडे केली. 

 

टॅग्स :Puneपुणेgirish bapatगिरीष बापटcongressकाँग्रेसnewsबातम्या