शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत नोकरी देण्याच्या आमिषाने फसवणुक करणारी टोळी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 16:30 IST

त्यांचे नातेवाईकांसह वैष्णव देवी येथे देवदर्शनासाठी ग्रुपने गेले होते़.  तेथे एका महिलेची व त्यांची मावशी म्हणून ओळख झाली़ आणि पुढे...

पुणे : रेल्वेत क्लार्कपदाचे नोकरीचे आमिष दाखवून विश्वास संपादन करण्यासाठी युनिफॉर्म शिवण्यासाठी कापड देऊन फसवणुक करणाऱ्या टोळीला रेल्वेपोलिसांनी अटक केली आहे.विश्वजित शिवाजीराव माने (वय ५२, रा़ चव्हाणमळा, आष्टा, ता़ वाळवा, जि़ सांगली) व त्याचे साथीदार हनुमान शिवाजी तानवडे (वय २२, रा़ पिंगेवाडी, ता़ शेवगाव, जि़ अहमदनगर), महेश कारभारी ससे (वय २५, रा़ ससेवाडी, जेऊर, ता़ जि़ अहमदनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़.  त्यांचे अन्य साथीदार फरार असून मुख्य सुत्रधार अजित खंडागळे याला रविवारी सकाळी वाईहून ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत हंसराज दत्तोबा जाधव (वय ४४, रा़ लातुर) यांनी फिर्याद दिली आहे़. रेल्वे पोलिसांनी सांगितले की, त्यांचे नातेवाईकांसह वैष्णव देवी येथे देवदर्शनासाठी ग्रुपने गेले होते़.  तेथे एका महिलेची व त्यांची मावशी म्हणून ओळख झाली़.  त्यानंतर दोन महिन्यांनी जाधव यांच्या आत्याचा मुलगा लक्ष्मण याचे मोबाईलवर फोन आला की, रेल्वेत नोकरी लावायची असेल तर माझी ओळख आहे़, मी काम करुन देते, असे ती महिला म्हणाली़, त्यानंतर २ जानेवारी रोजी जाधव व त्याचे नातेवाईक या महिलेला भेटायला स्वारगेटला गेले़.  तेथे या महिलेने विश्वजीत माने याची ओळख करुन दिली. त्यावेळी माने याने दिल्ली येथे राहणारे अजित खंडागळे हे आपले मित्र असल्याचे व ते नोकरी लावून देतील, असे त्याने सांगितले़. 

 त्यांच्याकडील रेल्वेचे ओळखपत्र दाखविले़ त्यांवर विश्वास बसल्याने त्यांनी त्यांचा पुतण्याचा बायोडाटा दिला़.  त्यानंतर माने याने त्याला पुणे रेल्वे स्टेशनवर बोलावून प्रथम ५० हजार रुपये घेतले़. त्यावेळी रेल्वे हॉस्पिटल येथून वैद्यकीय तपासणी करुन घेतली़.  त्यानंतर बँक खात्यावर २५ हजार रुपये भरायला लावले़.  त्यानंतर त्याला रेल्वेचा युनिफॉर्म शिवण्याकरीता कपडे देऊन १७ जानेवारीला कामावर हजर होण्याचे पत्र दिले़. त्यानंतर त्याने त्याच्या मित्राकडूनही माने याने १ लाख रुपये घेतले़.  त्यांनाही माने याने १७ जानेवारी रोजी युनिफॉर्म शिवण्याकरीता कापड देऊन २२ जानेवारी रोजी कामावर हजर राहण्याचे पत्र दिले़ परंतु, प्रत्यक्षात दिलेले पत्र बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी रेल्वे लोहमार्ग पोलिसांकडे फिर्याद दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसrailwayरेल्वे