शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील संतापजनक घटना! तरुणीने लग्नास नकार दिल्याने पाठ, गाल, दंडावर तरुणाने घेतला चावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 11:05 IST

तरुणावर विनयभंगासह इतर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले

येरवडा : "माझे तुझ्यावर प्रेम आहे, माझ्याशी लग्न कर" असे म्हणून चाकूचा धाक दाखवत बळजबरीने तरुणीला चावा घेऊन, हाताने मारहाण करीत गंभीर जखमी करणाऱ्या सराईत आरोपी विरुद्ध येरवडापोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी निहाल विशाल भाट (वय 23,रा. भोसले वस्ती कंजारभाट येरवडा) याच्याविरुद्ध विनयभंगासह इतर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपी निहाल भाट याला येरवडा पोलिसांनी सोमवारी अटक केली.

येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  तरुणी ही शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तिच्या घरी असताना तिच्या ओळखीचा निहाल भाट हा हातात चाकू घेऊन आला."तू बाहेर ये,  माझ्यासोबत चल, नाहीतर मी दरवाजा तोडून घरात घुसेल,  मला कोणी अडवले तर त्याला मी जिवंत सोडणार नाही" अशी धमकी देत तो शिवीगाळ करत होता. त्याला समजावण्यासाठी तरुणी बाहेर आल्यावर बळजबरीने त्याने तिला चाकूचा धाक दाखवून मोटरसायकलवर बसून स्वतःच्या घरी घेऊन गेला. "माझे तुझ्यावर प्रेम आहे ,माझ्यासोबत लग्न कर" असे म्हणून हाताने तोंडावर मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याला विरोध केल्यानंतर त्याने मुलीच्या दंडावर ,पाठीवर, गालावर दाताने चावा घेऊन जखमी केले. तसेच हातातील चाकूने उजव्या पायाच्या नडगीवर तसेच गुडघ्यावर मारून गंभीर जखमी केले. गंभीर घटनेनंतर तरुणीने त्याच्या तावडीतून कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली. शनिवारी रात्री खाजगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर रविवारी येरवडा पोलीस स्टेशन येथे तिने सराईत गुन्हेगार निहाल भाट याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.  याप्रकरणी रविवारी येरवडा पोलिसांनी निहाल विरुद्ध गुन्हे दाखल केले होते. या गंभीर घटनेनंतर तो फरार झाला होता. सोमवारी सकाळी तो त्याच्या घरी आल्याची खात्रीशीर माहिती पोलीस शिपाई श्रीनाथ  कांबळे व अजित वाघुले यांना मिळाली होती. त्यानुसार तात्काळ त्याच्या घरी जाऊन त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. निहाल हा येरवडा पोलीस स्टेशन कडील सराईत आरोपी असून त्याच्यावर गंभीर मारहाणीचे तसेच इतर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गंभीर घटनेमुळे येरवड्यात पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती गाताडे करीत आहे .

टॅग्स :Yerwadaयेरवडाmarriageलग्नWomenमहिलाPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारी