शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
5
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
6
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
7
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
8
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
9
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
11
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
12
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
13
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
14
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
15
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
16
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
17
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
18
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
19
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

वाहतूक सेवा विस्कळीत, आंदोलनाचा परिणाम, प्रवासी-चाकरमान्यांचा झाला खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 3:41 AM

कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेनंतर बुधवारी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदमुळे रेल्वे वगळता शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा विस्कळीत झाली. शालेय विद्यार्थी वाहतूक करणा-या काकांनी आपली वाहने रस्त्यावर न आणल्याने अनेक विद्यार्थ्यांना शाळेला सुटी घ्यावी लागली.

पुणे - कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेनंतर बुधवारी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदमुळे रेल्वे वगळता शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा विस्कळीत झाली. शालेय विद्यार्थी वाहतूक करणा-या काकांनी आपली वाहने रस्त्यावर न आणल्याने अनेक विद्यार्थ्यांना शाळेला सुटी घ्यावी लागली. राज्य परिवहन आणि पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिडेटच्या (पीएमपी) अनेक फे-या रद्द झाल्याने चाकरमाने आणि परगावी जाणा-या प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.आंदोलक सकाळपासून शहरात फिरत असल्याने लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, तुळशीबाग, मध्यवर्ती पेठा, उपनगरांतील दुकाने दुपारपर्यंत बंद झाली होती. सार्वजनिक बसवर दगडफेकीचे प्रकार घडले, तसेच काही बसची हवा सोडून देण्यात आली. रिक्षा-कॅब ही वाहनेदेखील रस्त्यावर आली नाहीत.बुधवारी सायंकाळी सहापर्यंत हीच स्थिती पाहायला मिळाली. दळणवळणासाठी वाहनेच नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. स्वारगेट स्थानकातील स्वारगेट-सातारा विनावाहक बस सकाळपासूच बंद ठेवण्यात आल्या होत्या. तर, पहाटे व सकाळी काही मार्गांवर गाड्या सोडण्यात आल्या. मात्र, सकाळी ११ दरम्यान आंदोलनाची तीव्रता वाढल्याने लांब पल्ल्याच्या सर्वच गाड्या आगारातून सोडण्यात आल्या नाहीत. त्यामुळे औंरगाबाद, नाशिक, मुंबई, लातूर, उस्मानाबाद, पंढरपूर, नगर व कोल्हापूर अशा लांब पल्ल्याच्या सर्वच गाड्या बंद होत्या.रेल्वे स्थानकावर घोषणाबाजीआंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करीत पुणे स्टेशनकडेही आपला मोर्चा वळवला होता. सुमारे १५० कार्यकर्त्यांनी स्टेशनमध्ये घुसून प्लटफॉर्म एकवर जोरदार घोषणाबाजी केली.स्थानकातील रेल्वे ट्रॅकवर आंदोलकांनी उतरण्याच्या प्रयत्न केला असता, त्यांना शीघ्र कृती दलाच्या जवानांनी रोखले. सुमारे १५ मिनिटे घोषणाबाजी केल्यानंतर आंदोलनकर्त्यांना स्थानकाबाहेर काढण्यात आले.दरम्यान, आंदोलनामुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर काही परिमाण झाली नाही. तसेच, स्थानकावर तोडफोडीचाही काही प्रकार झाला नाही.पिंपरीमध्ये कार्यकर्त्यांंंनी ट्रॅकवर ठिय्या मांडला, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून मिळाली.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद