शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

खासगी प्रवासी बसेसमुळे संगमवाडीत वाहनांच्या रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 20:55 IST

दिवाळीनंतरच्या परतीच्या वाहतुकीने संगमवाडी पुलासह सादलबाबा चौकापर्यंत सोमवारी दिवसभर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

पुणे : दिवाळीनंतरच्या परतीच्या वाहतुकीने संगमवाडी पुलासह सादलबाबा चौकापर्यंत सोमवारी दिवसभर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. येथील खासगी वाहनतळांवर खासगी प्रवासी बसेस मोठ्याप्रमाणावर आल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. त्यातच भर म्हणून प्रवाशांना घेण्यासाठी आलेली खासगी वाहने, रिक्षा व प्रवासी कार बेशिस्तपणे उभ्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखीच भर पडली. वाहतूक पाेलिसांनी ही वाहतूक काेंडी साेडविण्याचा प्रयत्न केला. 

    संगमवाडीतील खाजगी प्रवासी बस पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी ही नित्याची बाब झालेली आहे . यामुळे अनेक लहान मोठे अपघात घडत असतात. सोमवारी सकाळी दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यामुळे राज्यभरातून पुण्यात परतणारी खासगी बसेस व वाहने  संगमवाडी येथील बस थांब्यावर आली होती . त्यामुळे सकाळी दहा वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी झाली होती. नेहमीपेक्षा अधिक  खासगी बसेस या परिसरात आल्यामुळे दैनंदिन शहराकडे जाणाऱ्या वाहनचालकांना याचा मनस्ताप सहन करावा लागला. दिवाळीपूर्वी सुट्टीला शहरातून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांमुळे देखील अशाच प्रकारचे वाहतूक कोंडी झाल्याची तक्रार नागरिकांनी केली होती .मात्र वाहतूक पोलिसांकडून यासाठी कोणतेही नियोजन करण्यात आलेले नव्हते .शहराकडे जाणाऱ्या संगमवाडीच्या मुख्य रस्त्यावर अशाप्रकारे वाहतूक कोंडी झाल्यामुळे नागरिकांची चांगली गैरसोय झाली.

       शहरातील मुख्य रस्त्यांवर मेट्रोसह विविध कामे सुरू असल्यामुळे शहरभर वाहतूक कोंडीची समस्या पुणेकरांना भेडसावत असते. त्यातच दिवाळीच्या सुटीनंतर परतीची वाहने शहरात आल्यामुळे या वाहतूक कोंडीचा नागरिकांना सामना करावा लागला. दरम्यान संध्याकाळी देखील सारखेच चित्र या भागात पाहायला मिळाले. संध्याकाळी सुद्धा खासगी बसेसमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या हाेत्या. कार्यालयांमधून घरी निघालेल्या नागरिकांना याचा माेठा मनस्ताप सहन करावा लागला. यावर लवकर ताेडगा काढण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत अाहे.

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडीsangam chowkसंगम चौकDiwaliदिवाळी