वाहतूककोंडीचा डोक्याला ताप

By Admin | Updated: May 24, 2014 05:17 IST2014-05-24T05:17:12+5:302014-05-24T05:17:12+5:30

येथील तळेगाव स्टेशन चौकात सायंकाळी होणारी वाहतूककोंडी ही तळेगावकरांची डोकेदुखी ठरत आहे. या कोंडीने नागरिक त्रस्त आहेत.

Traffic head head fever | वाहतूककोंडीचा डोक्याला ताप

वाहतूककोंडीचा डोक्याला ताप

तळेगाव दाभाडे : येथील तळेगाव स्टेशन चौकात सायंकाळी होणारी वाहतूककोंडी ही तळेगावकरांची डोकेदुखी ठरत आहे. या कोंडीने नागरिक त्रस्त आहेत. तळेगाव - चाकण रस्त्यावरील तळेगाव स्टेशन येथे सायंकाळच्या वेळी होणारी वाहतूककोंडी कायमस्वरूपी सुटण्यासाठी प्रशासनाने केलेले प्रयत्न तोकडे पडल्याचे दिसून येते. वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी या ठिकाणी पोलीस असतात. मात्र त्यांची संख्या कमी असल्याने त्यांच्या कामावर मर्यादा येतात. बेशिस्त वाहनचालकांवर पोलिसांकडून कडक कारवाईची अपेक्षा आहे. या ठिकाणाहून मोटारसायकलचालक सर्रासपणे ट्रिबलसीट जाताना दिसतात. अशा वाहनचालकांवर पोलिसांकडून कारवाई केलीही जाते. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपाने या कारवाईला मर्यादा येतात. बेशिस्त वाहनचालकांवर वचक बसण्यासाठी पोलिसांनी कडक भूमिका घेणे गरजेचे आहे. पोलीस निरीक्षक विठ्ठल क्षीरसागर यांनी ही समस्या सोडवावी, अशीनागरिकांची अपेक्षा आहे. तळेगाव - चाकण या राज्य महामार्गावरून मुंबईकडून चाकणकडे महाळुंगे, रांजणगाव, शिक्रापूर या एमआयडीसीसाठी व त्याच परिसरातून मुंबईकडे जाणार्‍या अवजड वाहतुकीसाठी, कंटेनर जाण्या-येण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात.त्याचबरोबर खेड, जुन्नर आंबेगाव , शिक्रापूर, अहमदनगर या भागासाठी आणि तळेगाव एमआयडीसीमध्ये याच रस्त्याचा वापर केला जातो.परिसरात प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, कॉलेज, रुग्णालये आहेत.(वार्ताहर)

Web Title: Traffic head head fever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.