Traffic congestion on Pune-Mumbai Express Way | पुणे- मुंबई एक्सप्रेस वे'वर वाहतूक कोंडी
पुणे- मुंबई एक्सप्रेस वे'वर वाहतूक कोंडी

लोणावळा : पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर मुंबईच्या दिशेने अवजड जॉब घेऊन जाणारा ट्रेलर रस्त्यामध्येच फिरल्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.


मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने अवजड जॉब घेऊन निघालेला ट्रेलर खंडाळा घाटातील उतारावर असताना चालकाचा त्याच्यावरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रेलर रस्त्यावरच सरकला. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तिन्ही लेन बंद झाल्याने वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला होता. साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सायंकाळच्या सुमारास लोणावळा व खंडाळा परिसरात पावसाला सुरुवात झाली होती. पावसामुळे रस्ते निसरडे झाले होते. या रस्त्यावरून सदरचा अवजड जॉब घेऊन जाणारा ट्रेलर सरकल्याने हा अपघात झाला. खंडाळा महामार्ग पोलीस व रस्ते विकास महामंडळाचे पथक यांनी सदर ठिकाणी वाहतूक नियंत्रणाकरिता प्रयत्न करत सदरचा ट्रेलर क्रेनच्या सहाय्याने बाजूला केला.


Web Title: Traffic congestion on Pune-Mumbai Express Way
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.