शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाच्या पार्श्वभूमीवर स्वारगेट भागातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल! जाणून घ्या…

By नितीश गोवंडे | Updated: November 18, 2024 12:16 IST

मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी पीएमपी बस    

पुणे : स्वारगेट भागातील वाहतूक व्यवस्थेत मंगळवारी (दि. १९) आणि बुधवारी (दि. २०) बदल करण्यात येणार आहे. गणेश कला क्रीडा मंच परिसरातील मतदान केंद्रातून मतपेट्या, तसेच अन्य साहित्य पीएमपी बसने वितरित करण्यात येणार असल्याने या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.पीएमपी बसमधून मतपेट्या आणि मतदान साहित्याची वाहतूक करण्यात येणार आहे. त्यामुळे स्वारगेट परिसर ते नेहरु स्टेडियम परिसरातील वाहतूक व्यवस्थेत मंगळवारी आणि बुधवारी बदल करण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली. मंगळवारी (१९ नोव्हेंबर) सकाळी सहा ते दुपारी एकपर्यंत या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. स्वारगेट येथील देशभक्त केशवराव जेधे चैाकातून सारसबागेकडे जाणाऱ्या वाहनांनी डाव्या मार्गिकेने जावे. उजव्या मार्गिकेवर मतदान साहित्याची वाहतूक करणाऱ्या पीएमपी बससाठी जागा उपलब्ध करून देणात येणार आहे.बुधवारी (२० नोव्हेंबर) सायंकाळी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सायंकाळी सहा ते रात्री बारा यावेळेत सोलापूर रस्त्याने सारसबागेकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. स्वारगेट येथील समतल विलगक (ग्रेट सेपरेटर) वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. बुधवारी सायंकाळी सहानंतर या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. मतदान साहित्य गणेश कला क्रीडा येथील मुख्य केंद्रात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे सारसबागेकडे जाणाऱ्या वाहनांनी लक्ष्मीनरायण चित्रपटगृह चौकातून उजवीकडे वळून मित्रमंडळ चौकमार्गे सारसबागेकडे जावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Votingमतदान