शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

बघणाऱ्याच्या अंगावर ''काटे'' उभे राहतील अशी या गावाची परंपरा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 18:06 IST

श्रद्धा म्हटली की धोका, भीती अशा कोणत्याही गोष्टींना थारा दिला जात नाही. पुणे  जिल्ह्यातील गुळुंचे या गावात भरणाऱ्या यात्रेतही काटेबारस नावाची आगळीवेगळी प्रथा आहे.  

पुणे (नीरा) : श्रद्धा म्हटली की धोका, भीती अशा कोणत्याही गोष्टींना थारा दिला जात नाही. पुणे  जिल्ह्यातील गुळुंचे या गावात भरणाऱ्या यात्रेतही काटेबारस नावाची आगळीवेगळी प्रथा आहे . या गावात  काटे असलेल्या बाभळीच्या ढिगावर भाविक उड्या घेतात. त्यातही चक्क उघड्या अंगाने.  ही यात्रा जवळपास दहा दिवस साजरी होत असल्याने आजूबाजूच्या पंचक्रोशीतून गर्दी होत असते. 

 गेली अनेक वर्ष ही या यात्रेची परंपरा पाळली जाते. द्वादशीला भल्या पहाटे चार वाजता शिवभक्त मंदिराशेजारील ओढ्यात अंघोळ करून गावाबाहेरील मानाच्या कठीचे दर्शन घेऊन मंदिरापर्यंत दंडवत घालत येतात. गुळुंचे गावासह बारा वाड्यातील ग्रामस्थांनी ग्रामदैवतास पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. त्यानंतर मंदिरासमोर ढोलांचा आवाज घुमू लागतो आणि सुरु होतो. छबिन्याच्या खेळ. ढोल, ताशे व झांजेच्या कडकडाटात अवघा आसमंत घुमू लागतो. भक्त एकमेकांवर मुक्तपणे गुलाल - खोबऱ्यांची उधळण करत 'हर भोला हर महादेवा'ची गर्जना करतात. त्यानंतर उत्सव मुर्तीसह दोन्ही पालख्या गावाबाहेरील काठीच्या भेटीसाठी वाजत गाजत निघतात. पुढे पालखीची प्रदक्षिणा पूर्ण होते. आणि सुरु होते ही प्रथा. 

त्यासाठी गोलाकार आकारात मोठ्या प्रमाणात जवळपास ट्रकभर काटे गोलाकार मांडले जातात. पालखी त्या गोलाभोवती प्रदक्षिणा घालते आणि श्रद्धेपायी गावकरीही या काट्यात एका पाठोपाठ उड्या घेतात. बघतानाही अंगावर काटा आणणारी ही प्रथा आणि यात्रा हीच या गावाची ओळख आहे. 

टॅग्स :cultureसांस्कृतिकPurandarपुरंदरTempleमंदिर