शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

कांदा भाववाढीचा व्यापाऱ्यांनाच लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 13:53 IST

Onion Price Updates : सामान्यांच्या डोळ्यात कांद्याच्या तिखटपणापेक्षा भाववाढीनेच पाणी..

ठळक मुद्देयंदा नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये कांद्याचे भाव कडाडल्याने चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरूतसेच रब्बी हंगामात रोपांच्या मरतुकीमुळे लागवड कमीपुढील वर्षीही भाव तेजीत ; यंदा खरीप पीकही गेले शेतकऱ्यांकडे मालच कमी :

संजय बारहाते- टाकळी हाजी : सध्या कांद्याच्या भावाने विक्रमी पातळी गाठली आहे. सामान्यांच्या डोळ्यात कांद्याच्या तिखटपणापेक्षा भाववाढीनेच पाणी आले आहे. भाववाढीमुळे शेतकरी खुशीत असल्याची चर्चा होत आहे; मात्र खरा लाभ शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यालाच झाला आहे. कांद्याचे भाव गेल्या डिसेंबरमध्ये नीचांकी पातळीवर होते. नीचांकी भावाने शेतकऱ्यांच्या प्रपंचाचा गाडाच मोडून गेला होता. यंदाही अतिवृष्टीने बहुतांश शेतकऱ्यांचे कांदापीक सडल्याने मालच कमी निघत आहे. परिणामी भाववाढीची लॉटरी व्यापाऱ्यांनाच पावली आहे.यंदा नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये कांद्याचे भाव कडाडल्याने चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू झाली. राज्यात कांदा उत्पादन प्रामुख्याने नाशिक, पुणे, अहमदनगर, सोलापूर जिल्हयात सर्वाधिक होते. खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात कांद्याचे उत्पादन होत असले तरी खरिपात पीक अतिपावसामुळे गेले. रब्बीलाही कांदारोपांमध्ये पाणी साचून राहिल्याने रोपांची मरतुक मोठ्या प्रमाणात झाली. रोपेच कमी असल्याने रब्बी कांदा लागवडीखालील क्षेत्र निम्म्याने घटले. कांदापिक लावगडीनंतर साडेचार महिन्यांत येत असल्याने विहीर बागायतदार शेतकरीसुद्धा कांद्याचे पीक घेतो. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात कांद्याच्या नीचांकी पातळीचा अनेक शेतकºयांची दैना झाली होती. टाकळी हाजी येथील शेतकरी महिला मनीषा बारहाते यांची प्रत्येकी ५० किलोच्या ३२ पिशव्यांची कांदापट्टी अवघी चार रुपये हाती आली होती. कमी भावामुळे वैतागलेल्या शेतकºयांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांना कांद्याची रक्कम व बांगड्या आहेर पाठविल्याची चर्चा राज्यभर गाजली.कांद्याचे पीक उत्पादनासाठी बी, मशागत, शेणखत, रासायनिक खते, कीटकनाशके, वीजबिल, लागवड, काढणी, मजुरी यांसाठी सुमारे एकरी ६० ते ७० हजार रुपये खर्च येतो. यंदा तर रोपे पावसाने खराब झाल्याने हा खर्च एक लाखाच्या घरात जाण्याची शक्यता आहे, असे प्रगतिशील शेतकरी सोनभाऊ मुसळे यांनी सांगितले. गेल्या वर्षी कांद्याला मातीमोल भाव मिळाल्याने उत्पादन खर्चसुद्धा मिळत नव्हता. हजारो शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस नेण्यापेक्षा कांदाचाळीमध्ये साठवून ठेवण्यावरच भर दिला. मात्र साठवलेला कांदाही पावसाचे पाणी चाळीत साठून सडून गेला. शेतकऱ्यांना पीक कर्ज परत बँकेत भरता आले नाही. उधारीवर आणलेल्या खते, कीटकनाशकाचे बिलही देता आले नाही. उधारी थकल्याने यंदा शेतकऱ्यांनी पुन्हा गेल्यावर्षीसारखे नुकसान होऊ नये, म्हणून पाच-सहा रुपये किलो दराने व्यापाऱ्याला कांदा विकून टाकला होता. परिणामी कांदा भाववाढीचा फायदा मोठे शेतकरी व व्यापारी यांनाच झाला. लहान कांदा उत्पादक शेतकरी मात्र भाव आहे, पण कांदाच नसल्याने निराश झाला आहे. कर्जाचा बोजा मात्र वाढला आहे.....शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामामध्ये कांद्याची लावगड केली जाते. सप्टेंबरमध्ये रोपे टाकतात. मात्र अतिपावसाने रोपे व ज्यांनी कांदे लागवड केली, ती पण गेल्याने दुबार लागवडीचे संकट बळीराजावर आले असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे यांनी दिली....कांदा लागवड महिला मजुरांना घेऊन दिवसा करावी लागते, मात्र काही वेळा वीज रात्री सोडतात दिवसा बंद ठेवतात. त्यामुळे लागवडीसाठी मोठा प्रश्न उभा राहत असून दोन हजार रुपये भाड्याने डिझेल जनरेटर आणून लागवड करावी लागते........कांद्याला हवाय हमीभाव : कांद्याला प्रतिवीस रुपये हमीभाव दिला तरी शेतकरी व ग्राहक दोन्ही समाधानी होतील. मात्र शेतकरी अनेक वर्षे मागणी करूनही हमीभाव शासन देत नाही. तसेच शेतकरी व किरकोळ विक्रेता यामध्ये मोठी तफावत असून, शेतकऱ्याकडून घेतलेला कांदा ग्राहकाला दुप्पट भावात घ्यावा लागत आहे.......गेल्यावर्षी मातीमोल भाव मिळाल्याने यावर्षी लवकरच कांदा विकलाकांदा भाववाढीचा फायदा व्यापाऱ्यांना व मोठ्या शेतकऱ्यांनायंदाही अतिपावसामुळे लागवडी घटल्याखराब हवामानाचा पुन्हा कांद्याला फटका

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी