शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
2
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
3
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
4
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
5
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
6
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
7
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
8
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
9
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
10
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
11
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
12
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
13
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
14
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
16
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
17
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
18
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
19
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
20
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब

Tamhini Ghat: पर्यटकांनो काळजी घ्या! ताम्हिणी घाटात ३०० ते ५०० मिमी पाऊस, काही भागात दरडी कोसळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 15:05 IST

यंदा ताम्हिणी घाटात प्रचंड पाऊस झाला असून काही भागांत दरडी कोसळल्याने घाट रस्ता बंदही करण्यात आला होता

पुणे : यंदाच्या पावसाळी हंगामात घाटमाथ्यावर जून महिन्यात वरुणराजाने ओढ दिली होती. पण, जुलै महिन्यात मात्र पावसाने जोरदार हजेरी लावली. सुरुवातीला एका दिवसात शंभर मिमी पावसाची नोंद व्हायची. आता गेल्या चार-पाच दिवसांमध्ये तर तीनशे ते पाचशे मिमी पावसाची नोंद होत आहे. त्यामुळे घाटमाथ्यावर वरुणराजा धो-धो बरसला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, यंदा १०६ टक्के पावसाचा अंदाज देण्यात आला होता. पण, जून महिना कोरडाच गेला. त्यामुळे सर्वांच्या चिंतेमध्ये वाढ झाली होती. धरणांतील साठाही कमी होऊ लागला होता. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाला सुरुवात झाली आणि मग संपूर्ण महिना ‘तो’ धो-धो बरसला. पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरणेही भरली. त्यानंतर खडकवासला धरणातून विसर्ग सोडण्यात आला आणि काही भागांना पुराचा फटकाही सहन करावा लागला. यंदा पवना धरणात जूनपासून आतापर्यंत १८२४ मिमी, मुळशीत २०७१ मिमी, टेमघरला २१५४ मिमी, पानशेतला १३४६ मिमी तर खडकवासलात ५२७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

१ जूनपासून धरणांतील पाऊस

पवना : १८२४ मिमीकासारसाई : ७०३ मिमीमुळशी : २०७२ मिमीटेमघर : २१५४ मिमीवरसगाव : १३५२ मिमीपानशेत : १३४६ मिमीखडकवासला : ५२७ मिमी

ताम्हिणी घाटात धुवाधार

यंदा ताम्हिणी घाटात प्रचंड पाऊस झाला. काही भागांत दरडी कोसळल्या. त्यामुळे घाट रस्ता बंदही करण्यात आला होता. एक दिवसात तीनशे ते पाचशे मिमी पावसाचा उच्चांक या घाटामध्ये पाहायला मिळाला. पण, दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर कमी झाला असून, आता शंभर मिमीच्या जवळपास पाऊस होत आहे. लोणावळा भागातही गेल्या चार-पाच दिवसांमध्ये प्रचंड पाऊस झाला.

ताम्हिणीत घाटातील पाऊस

दि. १५ जुलै : १५ मिमीदि. १८ जुलै : ८६ मिमी

दि. १९ जुलै : १६८ मिमीदि. २० जुलै : १८१ मिमी

दि. २१ जुलै : १६८ मिमीदि. २२ जुलै : २३० मिमी

दि. २३ जुलै : २६८ मिमीदि. २४ जुलै : ३०० मिमी

दि. २५ जुलै : ५५६ मिमीदि. २६ जुलै : २८४ मिमी

दि. २७ जुलै : १४० मिमी

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसtourismपर्यटनSocialसामाजिकDamधरणNatureनिसर्ग