शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा उद्या निकाल, रिझल्ट कुठे व कसा पाहायचा? A टू Z माहिती
6
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
7
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
8
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
9
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
10
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
11
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
12
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
13
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
14
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
15
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
16
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
17
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
18
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
19
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
20
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
Daily Top 2Weekly Top 5

भीमा-पाटसच्या अध्यक्षपदी कुल

By admin | Updated: June 6, 2015 22:18 IST

पाटस (ता. दौंड) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राहुल कुल यांची तर उपाध्यक्षपदी नामदेव बारवकर

वासुंदे : पाटस (ता. दौंड) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राहुल कुल यांची तर उपाध्यक्षपदी नामदेव बारवकर यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी दिली.या वेळी सहायक निवडणूक अधिकारी तथा दौंडचे तहसीलदार उत्तम दिघे, कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक पाटील तसेच नवनिर्वाचित संचालक मंडळातील सर्व सदस्य यांच्यासह कारखान्याचे माजी संचालक, सभासद, कामगार व हितचिंतक व कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार राहुल कुल व नामदेव बारवकर यांची अध्यक्ष व उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी उपस्थित मान्यवरांसमवेत कारखान्याचे संस्थापक चेअरमन कै. मधुकाका शितोळे यांच्या कारखाना कार्यस्थळावरील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. भीमा-पाटस कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये कुल यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा पॅनलने सर्वच्या सर्व २१ जागांवर एक हाती विजय मिळवला होता. तर विरोधी पॅनलचे प्रमुख व दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखालील भीमा बचाव सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे.आज शनिवारी (दि. ६) १० च्या सुमारास कारखान्याच्या सभागृहामध्ये अध्यक्ष व उपाध्यपदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा दौंड-पुरंदर विभागाचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेमध्ये अपेक्षेप्रमाणे आमदार राहुल कुल यांची सलग चौथ्यांदा कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. (वार्ताहर)