अश्लील व्हिडिओ दाखवून चिमुरडीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 01:48 IST2019-02-20T01:48:10+5:302019-02-20T01:48:18+5:30

घरी कुणी नसल्याचा गैरफायदा घेत १३ वर्षाच्या मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवून शेजारी राहणाऱ्या तरुणानेच लैंगिक अत्याचार केले. तसेच तिला आरडाओरडा केल्यास मारण्याची धमकी दिली.

Torture of chimer by showing porn videos | अश्लील व्हिडिओ दाखवून चिमुरडीवर अत्याचार

अश्लील व्हिडिओ दाखवून चिमुरडीवर अत्याचार

पुणे : घरी कुणी नसल्याचा गैरफायदा घेत १३ वर्षाच्या मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवून शेजारी राहणाऱ्या तरुणानेच लैंगिक अत्याचार केले. तसेच तिला आरडाओरडा केल्यास मारण्याची धमकी दिली. घाबरून मुलीने हा प्रकार घरी कोणालाच सांगितला नाही. परंतु तिला त्रास होत असल्याने डॉक्टरांकडे गेल्यावर हा प्रकार उघडकिस आला. पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन येरवडा पोलीस ठाण्यात २५ वर्षाच्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

ही मुलगी आई व आजीसोबत येरवडा परिसरात राहत असून हा तरुण त्यांच्या शेजारी राहतो़ काही दिवसांपासून तिला पोटात त्रास होत असल्याने आईने तिला डॉक्टरांकडे नेले. त्यावेळी तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केले असल्याचे समोर आले. त्यानंतर तिच्यासोबत घडलेला प्रकार आईला मुलीने सांगितला. हा प्रकार ३ आॅक्टोंबरपासून सुरु होता़ मोबाईलमधील अश्लिल फोटो दाखवून तो तिच्यावर अत्याचार करीत असे़ हा प्रकार समोर आल्यानंतर मात्र तो आरोपी तरुण पसार झाला आहे.
 

Web Title: Torture of chimer by showing porn videos