शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

अपघातांबाबत टोलवाटोलवी, बीआरटी मार्गातील संख्या वाढली, एकही अपघात झाला नसल्याचा पीएमपीचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 03:29 IST

सार्वजनिक वाहतूक गतिमान करण्यासाठी बस रॅपिड ट्रान्झिस्ट (बीआरटी) मार्ग सुरू करण्यात आला. मात्र, या मार्गाचा वापर सार्वजनिक वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने बीआरटी मार्गातील अपघातांची संख्या वाढली आहे. परंतु, वर्षभरात बीआरटी मार्गात एकही अपघात झाला नसल्याचा दावा पीएलपी करत आहे.

- राहुल शिंदेपुणे : सार्वजनिक वाहतूक गतिमान करण्यासाठी बस रॅपिड ट्रान्झिस्ट (बीआरटी) मार्ग सुरू करण्यात आला. मात्र, या मार्गाचा वापर सार्वजनिक वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने बीआरटी मार्गातील अपघातांची संख्या वाढली आहे. परंतु, वर्षभरात बीआरटी मार्गात एकही अपघात झाला नसल्याचा दावा पीएलपी करत आहे, तर अपघातांची जबाबदारी पालिका प्रशासनाची नाही तर पीएमपीची आहे, असे उत्तर पालिकेच्या अधिका-यांकडून दिले जात आहे.संगमवाडी ते विश्रांतवाडी दरम्यानच्या बीआरटी मार्गातून सर्रासपणे खासगी वाहने जात आहेत. त्यातही संगमवाडी ते सादलबाबा चौक या बीआरटी मार्गातून सर्वाधिक दुचाकी व चारचाकी वाहने जातात. मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एका चारचाकी गाडीने दुचाकीस्वाराला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. चारचाकी गाडी पंक्चर झाल्यामुळे तिला क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढावे लागले. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांच्या समोरूनही खासगी वाहने बीआरटी मार्गातून जात होती. बीआरटी मार्गातून पीएमपी बसव्यतिरिक्त इतर वाहनांनी जाणे बेकायदेशीर आहे. खासगी वाहनांना रोखण्यासाठी पीएमपीने बीआरटी मार्गांवर सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली. परंतु, सुरक्षारक्षकांशी वाद घालून; काही वेळा हाणामारीवर उतरून चारचाकी चालक व दुचाकीस्वार संगमवाडी ते विश्रांतवाडी दरम्यानच्या बीआरटी मार्गात घुसत आहेत. एकाही वाहनावर कारवाई होत नसल्याने दररोज बीआरटीतून जाणाºयांचे धाडस वाढले आहे. त्यामुळे अपघातांची संख्याही वाढत चालली आहे. मात्र, वर्षभरात बीआरटी मार्गात एकही अपघात झाला नाही, असा दावा पीएमपीच्या प्रसिद्धी विभागाकडून करण्यात आला आहे. तसेच पालिका प्रशासनाने यात सहकार्य करावे, अशी अपेक्षा काही अधिकाºयांकडून व्यक्त केली जात आहे.बीआरटी परिसराजवळ राहणारे काही नागरिकच दररोज या मार्गातून जात आहेत. तसेच बीआरटीत घुसणाºयांना थांबविण्याचा प्रयत्न केला तर त्यांना शिव्या खाव्या लागतात. काही वाहनचालकांनी तर सुरक्षारक्षकांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जखमी केल्याचे प्रकार घडले आहेत.बीआरटीतून जाणाºया वाहनांचे क्रमांक सुरक्षारक्षकांकडून नोंदविले जातात. परंतु, एकाही वाहनचालकावर कारवाई होत नाही. ट्रक, टेम्पो, स्कूल बस, पाण्याचा टँकर, एसटी बस यांसह पोलिसांची वाहनेसुद्धा बीआरटी मार्गातून जातात. त्यामुळे कारवाई कोण कोणावर करणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.बीआरटी मार्ग केवळ ‘बस’साठी आहे. त्यासंदर्भातील फलक पालिकेकडून बीआरटी मार्गावर लावण्यात आले आहेत. वाहतुकीचे नियमन करणे हे पालिकेचे नाही तर पीएमपीचे काम आहे.- राजेंद्र राऊत, अधीक्षक अभियंता, पथ विभाग, महानगरपालिका, पुणेबारआरटी मार्गातून केवळ बस जाणे, अपेक्षित आहे. या मार्गातून जाणा-या इतर खासगी वाहनांवर पोलिसांच्या मदतीने नियमितपणे दंडात्मक कारवाई केली जाते. इतर वाहने या मार्गातून जाऊ नयेत, यासाठीच सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.- सुनील गवळी, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी