शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
3
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
4
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
5
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
6
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
7
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
8
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
9
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
10
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
11
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
12
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
13
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
14
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
15
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
16
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
17
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
18
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
19
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
20
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती

...अखेर पुणे - सातारा रस्त्यावरील टोल रद्द; नितीन गडकरी यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 15:47 IST

रस्त्यावर होणारे अपघात व आवश्यक उपाययोजनांचा एक खाजगी संस्था अभ्यास करत असून, लवकरच अहवाल सादर करणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली.

ठळक मुद्देरस्त्याच्या कामासाठी एनएच देणार ५० कोटी

पुणे : पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गावरील टोल रद्द करून रस्त्याच्या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ५० कोटींचा निधी देण्यात येईल. तसेच या रस्त्यावर होणारे अपघात व आवश्यक उपाययोजनांचा एक खाजगी संस्था अभ्यास करत असून, लवकरच अहवाल सादर करणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली. राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात तब्बल १३४ कोटी रुपयांची रस्ते,  पुलांची कामे करण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. यावेळी गडकरी बोलत होते. कार्यक्रमाला विधान परिषदेच्या उपाध्यक्षा डाॅ.निलम गोऱ्हे,  महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट,  सुप्रिया सुळे यांच्यासह सर्व आमदार व अधिकारी उपस्थित होते. 

पुणे - बंगळुरू रस्त्यावर नवे पुणे विकसित करा 

पुण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणा-या दोन रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी एक म्हणजे पुणे बंगळुरु महामार्ग. “पुणे बंगळुरु हा नवीन ग्रीन हाय-व्हे एक्सीस कंट्रोल आम्ही बांधत आहोत. या रस्त्यावर नवीन पुणे विकसित करण्याचा विचार करा. यामुळे भविष्यात पुण्याचे कंजेशन कमी होईल", असा सल्ला नितीन गडकरी यांनी अजित पवार यांना दिला. लवकरच, आम्ही या महामार्गाचे प्रेझेंटेशन महाराष्ट्र सरकारला देऊ आणि कामाला सुरुवात करू तसेच पुण्यासाठी हा महामार्ग महत्त्वाचा ठरेल असे देखील त्यांनी स्पष्ट केले. 

यामुळे पुणे- मुंबईची वाहतूक कोंडी कमी होईल 

नितीन गडकरी यांनी यावेळी पुण्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या आणखी एका महामार्गाची माहिती दिली आहे. “दक्षिणेतील म्हणजे आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळ याचा उत्तरेतील म्हणजे पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, दिल्ली, हिमाचल, उत्तराखंड येथील सगळं ट्राफिक मुंबईहून पुण्याला येतं. आम्ही ठरवलंय की हे सगळं ट्राफिक सुरतलाच थांबवू. त्यानंतर, सुरतपासून नाशिक, नाशिकहून अहमदनगर, अहमदनगरहून सोलापूर आणि सोलापूरहून अक्कलकोट, गुलबर्गा, यादगीर, कर्नुल आणि चेन्नई असा हा महामार्ग १२७० किलोमीटरचा असेल. ह्यावर आम्ही ४० हजार कोटी रुपये खर्च करणार आहोत. यामुळे, मुंबई-पुण्याचं हे सगळं ट्राफिक कमी होईल. हा ग्रीन महामार्ग आहे. याची सध्याची लांबी १६०० किलोमीटर इतकी आहे. ती कमी होऊन १२७० किमी होईल. यामुळे नवीन दिल्ली-चेन्नई प्रवासात ८ तासांची बचत होणार आहे. या प्रकल्पाचा महाराष्ट्राला नक्कीच फायदा होईल”, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

रिंगरोडचे बांधकाम आम्ही करू 

पुण्यात रिंगरोडचे काम सुरू आहे. पुण्याच्या विकासासाठी महत्त्वाचा असलेल्या या रिंगरोडचे भूसंपादन करून दिल्यास पुढील सर्व खर्च व बांधकाम आम्ही करू असे देखील नितीन गडकरी यांनी येथे स्पष्ट केले. तसेच दोन्ही पालखी मार्गांचे काम देखील लवकरच पूर्ण करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.

टॅग्स :PuneपुणेNitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार