शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

‘संत तुकाराम’चे कारभारी आज ठरणार

By admin | Updated: April 4, 2015 05:56 IST

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या २१ जागांसाठी गुरुवारी चार तालुक्यांतील विविध मतदान केंद्रांवर मतदान झाले. मुळ

पिंपरी : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या २१ जागांसाठी गुरुवारी चार तालुक्यांतील विविध मतदान केंद्रांवर मतदान झाले. मुळशी तालुक्यातील कासारआंबोली येथील मुलींच्या सैनिकी शाळेत उद्या शनिवारी सकाळी ८पासून मतमोजणी सुरू होणार असून, सायंकाळी सहापर्यंत सर्व निकाल हाती येऊ शकतील.मतमोजणीसाठी निवडणूक विभागाने तयारी पूर्ण केली असून, शुक्रवारपासूनच सैनिकी शाळेत कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुळशीचे तहसीलदार प्रशांत ढगे यांनी दिली. कार्यक्षेत्रातील मावळ, मुळशी, खेड, हवेली या तालुक्यांमधील ४२ मतदान केंद्रांवर गुरुवारी श्री संत तुकाराम कारखान्याची निवडणूक शांततेत पार पडली. मतपत्रिकेचा वापर करून हे मतदान झाल्याने मतपेट्या मोजणीकामी कासारआंबोली येथे हलविण्यात आल्या आहेत. बऱ्याच वर्षांनंतर कारखान्याची निवडणूक कार्यक्रमानुसार झाल्याने सर्वपक्षीय संत तुकाराम शेतकरी विकास पॅनलचे २१, शेतकरी परिवर्तनचे १७, तर अपक्ष १३ उमेदवारांमध्ये चांगलीच चुरस झाली. सुरुवातीला एकतर्फी वाटणाऱ्या वातावरणात चांगलीच चढाओढ व स्पर्धा दिसून आली. विद्यमान अध्यक्ष नानासाहेब नवले लौकिक कायम राखणार, की बाळासाहेब नेवाळे आपल्या पॅनलद्वारे परिवर्तन घडविणार, याची चर्चा रंगली आहे. काही अपक्ष उमेदवार आपल्या नातेसंबंधांचा हवाला देत विजयी होणार, असा दावा करीत आहेत. अनेक मतदार या वेळी निवडणुकीनंतर घोडेबाजार रंगणार असल्याचे भाकीत करीत आहेत. (वार्ताहर)