Pune: मेगा ब्लाॅकमुळे रविवारी १४ पुणे-लाेणावळादरम्यानच्या लाेकल गाड्या रद्द!
By अजित घस्ते | Updated: February 3, 2024 18:49 IST2024-02-03T18:48:55+5:302024-02-03T18:49:06+5:30
गाडी क्र. १२१६४ एमजीआर चेन्नई-लोकमान्य टिळक टर्मिनल्स मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस सेक्शनमध्ये ३.३० तास रेग्युलेट करण्यात येईल, प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे...

Pune: मेगा ब्लाॅकमुळे रविवारी १४ पुणे-लाेणावळादरम्यानच्या लाेकल गाड्या रद्द!
पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागात पुणे-लोणावळा दरम्यान इंजिनियरिंग आणि तांत्रिक दुरुस्तीच्या आणि देखभालीच्या कामांकरिता रविवार (दि.४) रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात पुणे-लोणावळा-पुणे दरम्यान १४ लोकल गाड्या रद्द राहतील. तसेच यावेळी गाडी क्र. १२१६४ एमजीआर चेन्नई-लोकमान्य टिळक टर्मिनल्स मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस सेक्शनमध्ये ३.३० तास रेग्युलेट करण्यात येईल, प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
या आहेत लोकल गाड्या रद्द
पुणे ते लोणावळा मार्गावर जाणाऱ्या गाड्या
-पुण्याहून लोणावळासाठी ०९:५७ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६२ रद्द राहील.
-पुण्याहून लोणावळासाठी ११:१७ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६४ रद्द राहील.
-शिवाजीनगरहून लोणावळासाठी १२:०५ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५९२ रद्द राहील.
- पुण्याहून लोणावळासाठी १५:०० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६६ रद्द राहील.
- शिवाजीनगरहून तळेगावकरिता १५:४७ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५८८ रद्द राहील.
- पुण्याहून लोणावळासाठी १६:२५ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६८ रद्द राहील.
- शिवाजीनगरवरून लोणावळाकरिता १७:२० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५७० रद्द राहील.
लोणावळावरून येणाऱ्या गाड्या रद्द :-
- लोणावळ्याहून शिवाजीनगरकरिता १०:०५ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५५९ रद्द राहील.
- लोणावळ्याहून शिवाजीनगरकरिता ११:३० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५९१ रद्द राहील.
- लोणावळ्याहून पुण्यासाठी १४:५० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६१ रद्द राहील.
- तळेगाव येथून पुणेसाठी १६:४० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५८९ रद्द राहील.
-लोणावळ्याहून शिवाजीनगरकरिता १७:३० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६५ रद्द राहील.
- लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी १८:०८ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६७ रद्द राहील.
- लोणावळ्याहून पुण्यासाठी १९:०० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६९ रद्द राहील.