शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रुबी हॉलमधील किडनी रॅकेट चौकशीसाठी समिती स्थापन करणार; तानाजी सावंत यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 21:12 IST

किडनी रॅकेट मध्ये अनेकांचा सहभाग असून रुबी हाॅस्पिटलच्या कारवाईनंतर हे प्रकरण थंड झाले होते.

पुणे: रुबी हॉल क्लिनिक मध्ये किडनी रॅकेट गेल्यावर्षी उघडकीस आले. त्याची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली शासकीय आणि अशासकीय सदस्यांची समिती नेमण्यात येईल. येत्या तीन महिन्यांत याबाबत अहवाल सादर करण्यात येईल, अशी घोषणा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी शुक्रवारी केली.

याबाबत आमदार माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत प्रश्न विचारला होता. या किडनी रॅकेट मध्ये अनेकांचा सहभाग आहे. परंतू, हाॅस्पिटलवर जुजबी कारवाई झाली आणि नंतर हे प्रकरण थंड झाले. याचे धागेदाेरे ससून रुग्णालयाच्या बरखास्त झालेल्या समितीपर्यंत देखील आहेत. परंतू, पुढे या प्रकरणात काहीच झाले नाही. यामधील मुख्य आरोपी फरारी आहेत. ही संघटित गुन्हेगारी असून, या रॅकेटचे लोन महाराष्ट्रात पसरल्याचे मिसाळ यांनी निदर्शनास आणले.तसेच धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारीत रुग्णालयांमध्ये मोफत किंवा पन्नास टक्के सवलतीच्या दरात गरीब आणि अल्प उत्पन्न असणाऱ्या नागरिकांवर करण्यात येणाऱ्या उपचारांची अनियमितता तपासण्यासाठी लेखा परीक्षकांच्या मार्फत परीक्षण करून अनियमितता आढळणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री सावंत यांनी केली.

मिसाळ म्हणाल्या की, या कल्याणकारी योजनेचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना मिळत नाही. त्यांना वैद्यकीय सेवा पासून वंचित राहावे लागते. काही गरजू नागरिकांना लाभ मिळतो. पण याची अंमलबजावणी काटेकोर व पारदर्शक पद्धतीने होत नाही. अशा रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी. मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 च्या अंतर्गत कलम 41 अनुसार धर्मादाय कायद्याखाली नोंदणीकृत असलेल्या सर्व रुग्णालयांमध्ये मोफत किंवा पन्नास टक्के सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया सह सर्व उपचार करण्याचे बंधन आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक रुग्णालयाच्या एकूण उत्पन्नाच्या दोन टक्के रकमेचा इंडिजंट पेशंट फंड निर्माण केलेला असतो. या फंडामधून रुग्णांना मोफत उपचार मिळतात. परंतू, या धर्मादाय हाॅस्पिटलमध्ये गरजू रुग्णांना उपचारच मिळत नाही. त्यांना पिटाळून लावले जाते. साेबत, हे लाभ हाॅस्पिटलमधील पात्र नसलेल्या जवळच्या लाेकांना दिले जातात. तसेच त्याचे बिल किती झाले याची माहीती दिली जात नाही. साेबत धर्मदाय कार्यालयाचे याकडे दुर्लक्ष झालेले असल्याने त्यांच्यावर काेणतीही कारवाई हाेत नाही.

टॅग्स :PuneपुणेTanaji Sawantतानाजी सावंतhospitalहॉस्पिटलGovernmentसरकारHealthआरोग्य