दारुड्या मुलाच्या त्रासाला कंटाळलेल्या पित्याने उचलले टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 08:41 IST2025-07-21T08:41:11+5:302025-07-21T08:41:50+5:30

Crime News Pune: पोलिसांनी आरोपी सुरेश जमदाडे याला घटनास्थळीच ताब्यात घेतले असून पुढील तपास फुरसुंगी पोलीस करत आहेत.

Tired of the troubles of his drunken son, the father took extreme measures | दारुड्या मुलाच्या त्रासाला कंटाळलेल्या पित्याने उचलले टोकाचे पाऊल

दारुड्या मुलाच्या त्रासाला कंटाळलेल्या पित्याने उचलले टोकाचे पाऊल

पुणे : फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका वडिलांनी आपल्या मुलाचा गमछ्याने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत व्यक्तीचे नाव प्रशांत सुरेश जमदाडे (वय 39 वर्षे, रा. गट नंबर 105, वलवा वस्ती, वडकी, ता. हवेली, जि. पुणे) असे आहे. आरोपी वडिलांचे नाव सुरेश बाबुराव जमदाडे (वय 59 वर्षे) असे आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मृत प्रशांत हा नेहमी दारूच्या नशेत घरात वाद घालत होता व कुटुंबियांना त्रास देत होता. वारंवार होणाऱ्या त्रासामुळे वडील सुरेश जमदाडे हे संतप्त झाले. रविवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास त्यांनी घरात असलेल्या गमछ्याने प्रशांत याचा गळा आवळला आणि त्यानंतर त्याचे डोके फरशीवर आपटून त्याचा खून केला.

घटनेची माहिती मिळताच फुरसुंगी पोलीस स्टेशनचे क्राईम पीआय खांडे, पीएसआय जगताप आणि त्यांच्या स्टाफने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी फॉरेन्सिक पथकही दाखल झाले आहे.

पोलिसांनी आरोपी सुरेश जमदाडे याला घटनास्थळीच ताब्यात घेतले असून पुढील तपास फुरसुंगी पोलीस करत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

Web Title: Tired of the troubles of his drunken son, the father took extreme measures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.