माहिती देण्यातच अधिकाऱ्यांचा वेळ
By Admin | Updated: January 23, 2017 02:32 IST2017-01-23T02:32:18+5:302017-01-23T02:32:18+5:30
आंबेगाव तालुक्यात माहिती अधिकार कार्यकर्ते प्रशाकीय अधिकाऱ्यांकडे नको ती माहिती मागवत असल्याने माहिती देण्यासाठी

माहिती देण्यातच अधिकाऱ्यांचा वेळ
अवसरी : आंबेगाव तालुक्यात माहिती अधिकार कार्यकर्ते प्रशाकीय अधिकाऱ्यांकडे नको ती माहिती मागवत असल्याने माहिती देण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वेळ वाया जातो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सरकारी कागदपत्रे वेळेत मिळत नसल्याने माहिती अधिकाराचा त्रास प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबरच सर्वसामान्यांना होत आहे. माहिती अधिकाराचा गैरवापर टाळावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहे.
आंबेगाव तालुक्यात विद्युत वितरण कंपनी तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांचे रेशनकार्डवरील नावे कमी-जास्त करणे, नवीन रेशनकार्ड काढणे त्याचप्रमाणे विद्युत वितरण कंपनीकडे कृषिपंप, घरगुती वीजकनेक्शन, जादा आलेले तलाठी कार्यालयात जमीन खरेदी-विक्रीची नोंद करणे ७/१२, ८अ, सातबारा उताऱ्यावरील नावे कमी करणे ही सर्वसामान्य नागरिकांची कामे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे असल्याने नागरिक वरील कार्यालयात हेलपाटे मारत असतात.(वार्ताहर)