हक्कांची घरे नोंदविण्यासाठी उपोषणाची वेळ,तीन आदिवासी महिलांची प्रकृती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:13 IST2021-02-05T05:13:32+5:302021-02-05T05:13:32+5:30

२६ जानेवारीपासून येथील आदिवासी बांधव व कातकरी महिलांना बेमुदत उपोषणाचा मार्ग निवडावा लागला. मात्र या उपोषणाची कोणीही दखल घेतली ...

Time of fasting to register rights houses, the condition of three tribal women is critical | हक्कांची घरे नोंदविण्यासाठी उपोषणाची वेळ,तीन आदिवासी महिलांची प्रकृती गंभीर

हक्कांची घरे नोंदविण्यासाठी उपोषणाची वेळ,तीन आदिवासी महिलांची प्रकृती गंभीर

२६ जानेवारीपासून येथील आदिवासी बांधव व कातकरी महिलांना बेमुदत उपोषणाचा मार्ग निवडावा लागला. मात्र या उपोषणाची कोणीही दखल घेतली नाही. आज उपोषणाचा ४ दिवस आहे. मात्र सकाळी उपोषणासाठी बसलेल्या महिलांची प्रकृती अचानक खालावली. यातील तीन महिलांची प्रकृती अतिशय गंभीर झाल्याने त्यांना तातडीने घोडेगांव येथील ग्रामिण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित उपोषणकर्त्यांनी ही मागणी आमच्या अस्तित्वाचीच मागणी असल्याने आम्ही हे बेमुदत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार केला आहे. शाश्वत संस्था, किसान सभा व बिरसा ब्रिगेड या आदिवासी संघठणांनी या उपोषणास पाठींबा दिला असून या संस्थांचे कार्यकर्ते उपोषणकर्त्यांना साहाय्य करत आहेत.

आमना जुन्या आंबगांवची घरा कोण्याच ग्रामपंचायतला नोंद नायेत. आमना कागदपत्रा मिळत नाही. शाळत जाऊला तर आधार कार्ड, जातीना दाखला नाय. त्यामुळे आमना साळत अन होस्टेल मा रायता येत नाय. चक्रीवादळात आमना करा मोडली पर कोणीच मदत केली नाय. ग्रामपंचायतला नोंद नाय असं सांगस : दादाभाऊ वाघ, संजय वळणे

आंबेगाव तालुक्याच्या जुने आंबेगाव येथील कातकरी आदिवासी बांधवांच्या घरांच्या नोंदी व्हाव्यात या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या महीलांची प्रकृत आज सकाळी अचानक बिघडल्याने त्यांना घोडेगाव येथील रूग्णालयात दाखल करताना उपोषणकर्ते व संघटना प्रतिनिधी.

छायाचित्र-कांताराम भवारी

Web Title: Time of fasting to register rights houses, the condition of three tribal women is critical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.