एल्गार परिषदेसाठी आज शहरात कडक बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:18 IST2021-02-05T05:18:50+5:302021-02-05T05:18:50+5:30
पुणे : गणेश कला क्रीडा रंगमंच येथे शनिवारी (दि.३०) एल्गार परिषद होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात परिषदेच्या ठिकाणी तसेच ...

एल्गार परिषदेसाठी आज शहरात कडक बंदोबस्त
पुणे : गणेश कला क्रीडा रंगमंच येथे शनिवारी (दि.३०) एल्गार परिषद होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात परिषदेच्या ठिकाणी तसेच शहराच्या वेगवेगळ्या भागांत पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
यापूर्वी ३१ डिसेंबरला एल्गार परिषद घेण्यासाठी निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी स्वारगेट पोलिसांकडे अर्ज केला होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतर एल्गार परिषदेला परवानगी नाकारल्यास परिषद रस्त्यावर घेऊ अन्यथा जेलबंद आंदोलनाचा इशारा बी. जी. कोळसे पाटील यांनी दिला होता. एक आठवड्यापूर्वीच पोलिसांनी एल्गार परिषदेला परवानगी दिली. शनिवारी (दि.३०) ही परिषद होत असल्याने स्वारगेट, टिळक रस्ता परिसरातील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी या भागात वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलीस नेमण्यात येणार आहे तसेच गणेश कला क्रीडा रंगमंच परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. शहरातील संवेदनशील ठिकाणी बंदोबस्तात वाढ करण्यात येणार आहे. स्वारगेट पोलिसांसह गुन्हे शाखेसह विशेष शाखेची पथके बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहे. तसेच केवळ २०० जणांनाच कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान, एल्गार परिषदेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मध्यरात्री शहराच्या वेगवेगळ्या भागांत शोधमोहीम (कोम्बिंग ऑपरेशन) राबवून दोन हजार जणांची चौकशी करण्यात आली आहे.
...
k