Throughout the day, the woman's jewelery worth Rs 3.5 lakh was snatched | भरदिवसा महिलेचे साडेतीन लाखाचे दागिने हिसकावले

भरदिवसा महिलेचे साडेतीन लाखाचे दागिने हिसकावले

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : रस्त्याने पायी चाललेल्या महिलेचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्यांनी भरदिवसा ३ लाख ६० हजार रूपयांचे दागिने हिसकावून पळ काढला. यावेळी झटापटीत महिलेच्या गळ्याला जखम झाली आहे. ही घटना विश्रांतवाडीतील टिंगरेनगरमध्ये लिली अपार्टमेंटसमोर रविवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.

याप्रकरणी ५४ वर्षाच्या महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेच्या मुलाच्या मोबाईल शॉपीचे रविवारी उद्घाटन होते. उद्घाटनानंतर महिला दागिने घालून एकटीच लिली इमारतीसमोरून पायी चालल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण, नेकलेस असा मिळून ३ लाख ६० हजारांचा ऐवज चोरून नेला. महिलेने आरडा-ओरडा केला, मात्र तोपर्यंत चोरट्यांनी पळ काढला होता.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Throughout the day, the woman's jewelery worth Rs 3.5 lakh was snatched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.