शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

‘थ्रिल’ आले युवकांच्या अंगलट...!

By admin | Updated: January 28, 2015 02:34 IST

सिंहगडावर फिरताना दाखविलेल्या भलत्याच ‘थ्रिल’मुळे दोन पर्यटक युवक धोकादायक कड्यावरून घसरले. मात्र, सुदैवाने एका झाडाला ते अडकले

खडकवासला : सिंहगडावर फिरताना दाखविलेल्या भलत्याच ‘थ्रिल’मुळे दोन पर्यटक युवक धोकादायक कड्यावरून घसरले. मात्र, सुदैवाने एका झाडाला ते अडकले. वनसंरक्षण समितीच्या सुरक्षारक्षकांनी तासाभराच्या प्रयत्नांनंतर दोघांनाही सुरक्षितपणे बाहेर काढले.प्रजासत्ताक दिनी चाकण येथील सात जणांचा एक ग्रुप सिंहगडावर आला होता. सहलीसाठी आलेल्यांची संख्याही सोमवारी जास्त होती. गड फिरताना दुपारी सव्वादोनच्या सुमारास त्यांच्यातील संतोष विश्वंभर बराटे हा दोन नंबरच्या दरवाजापासून पुढच्या बाजूच्या अवघड कड्यातून खालचा निसर्गरम्य परिसर पाहण्यासाठी उतरला. मात्र, हा धाडसी प्रयोग त्याच्या अंगलट आला. तो खाली घसरू लागला. त्याला वर येता येईना, म्हणून त्याचा मित्र अतुल भीमराव गवळी हाही खाली उतरला. धोकादायक कडा व खाली खोल दरी यांमुळे त्याला त्या मित्राची मदतही करता येईना व स्वता:लाही पुन्हा वर येता येईना. हे पाहून विशाल लायगुडे, सचिन निम्हण, अमित बरडे, ज्ञानेश्वर गावडे, विश्वजित गवळी हे मित्र घाबरले. त्यांनी तातडीने वनसंरक्षण समितीच्या सुरक्षारक्षकांशी संपर्क साधला.तोपर्यंत बघ्यांची गर्दीही जमली. घाटरस्त्यावरील वाहनांची गर्दी, वाहतूककोंडी यांमुळे वन समितीचे बहुतांश कर्मचारीही वाहतूक सुरळीत करण्यात अडकले होते. त्यामुळे रॉकक्लायम्बिंगचा वाहनतळावर सुरू असलेला साहसी उपक्रम थांबवून काही कर्मचारी या तरुणांच्या मदतीसाठी गडावर धावले. वन समितीचे सुरक्षारक्षक व टे्रकर्स संजय गायकवाड, नीलेश सांगळे हे दोराच्या साह्याने सुमारे ५० ते ६० फूट खाली कड्यात उतरले. त्यांनी कड्यात फसलेले संतोष व अतुल यांना धीर देऊन सुखरूप वर घेऊन येण्याचा प्रयत्न सुरू केला. पर्यटकांच्या गर्दीने ते दोघेही अधिक घाबरू लागले. गायकवाड यांनी त्यांना सुरक्षेची आवश्यक ती साधने देऊन दोर लावून वर आणण्यास सुरुवात केली. दरम्यान, नंदू जोरकर, शंकर पढेर, बबन मरगळे, धनराज सांबरे, उत्तम खामकर, हेमंत -पिंटू गोळे इतर सुरक्षारक्षक दोराच्या साह्याने त्या दोघांना वर घेण्यासाठी प्रयत्न करू लागले. अखेर दीड तासाच्या प्रयत्नांनंतर त्या दोघांना सुखरूप वर आणले. या दोघांच्या या थ्रिलमुळे मात्र वनसंरक्षण समितीच्या कर्मचाऱ्यांचे घाटातील वाहतुकीचे नियोजन काहीसे कोलमडले. परंतु, युवकांचा जीव वाचल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.(प्रतिनिधी)