पुण्यातील नगररस्त्यावर तीन मद्यधुंद तरुणांकडून तरुणीला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 13:15 IST2017-12-14T13:02:22+5:302017-12-14T13:15:12+5:30
चंदननगर परिसरात भर रस्त्यात रात्री तीन तरुणांकडून एका तरुणीला मारहाण झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पुण्यातील नगररस्त्यावर तीन मद्यधुंद तरुणांकडून तरुणीला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
पुणे : चंदननगर परिसरात भर रस्त्यात रात्री तीन तरुणांकडून एका तरुणीला मारहाण झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
नगर रस्त्यावरील पाचवा मैल उप्पाला हॉटेलशेजारी रात्री ही घटना घडली. व्हायरल झालेल्या व्हिडिओत मद्यधुंद अवस्थेतील तरुण एका तरुणीला मारहाण करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. सोमनाथनगरला जाणाऱ्या रस्त्याच्या शंभर मीटर अलिकडेच हनुमान मंदिराच्या समोर बुधवारी रात्री हा प्रकार घडला. तीन तरूणांचे टोळके तरूणीला मारत असुन तरूणी आपला बचाव करण्यासाठी आजूबाजूला मदतीसाठी ओरडत असल्याचे व्हिडीओत दिसून येत आहे. मारहाण का झाली याविषयी मात्र काहीही माहिती मिळू शकलेली नाही. या बाबत चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आल्याचे विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाईक पाटील यांनी सांगितले.