तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार : पुण्यातील भोसरीची घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 13:48 IST2018-05-05T13:48:41+5:302018-05-05T13:48:41+5:30
अवघ्या तीन वर्षांच्या मुलीवर २० वर्षांच्या व्यक्तीने बलात्कार केल्याची दुर्दैवी घटना पुण्यातील भोसरी येथे घडली आहे. याबाबत आरोपीला अटक करण्यात आली असून भोसरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार : पुण्यातील भोसरीची घटना
पुणे : अवघ्या तीन वर्षांच्या मुलीवर २० वर्षांच्या व्यक्तीने बलात्कार केल्याची दुर्दैवी घटना पुण्यातील भोसरी येथे घडली आहे. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
२ मे २०१८रोजी भीम चौक, भोसरी परिसरात राहणाऱ्या पीडित मुलीला आरोपी भीमा नागाप्पा कांबळे याने राहत्या घरात दरवाजा लावून अत्याचार केला. आरोपी या मुलीच्या परिसरात राहत असल्याने त्यांची ओळखही होती. मात्र तो या प्रकारचे कृत्य करत असेल याची कल्पनाही पीडितेच्या नातेवाईकांनी केली नव्हती. पीडितेच्या आईच्या हा सर्व प्रकार लक्षात आला. त्यानंतर या घटनेची वाच्यता कोणाकडे केली तर तुला व तुझ्या मुलीला बघून घेईन अशी धमकी पीडितेच्या आईला दिली. अखेर तिच्या आईने याबाबत लैंगिक अत्याचार केल्याचा फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी भीमा कांबळे याला अटक केली. याबाबत प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस टी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.