शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

होर्डिंग कापणाऱ्या तीन कामगारांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 01:29 IST

खंडणीविरोधी पथकाची कामगिरी : अपघातानंतर महिनाभर होते फरार

पुणे : होर्डिंग काढताना ते कोसळून झालेल्या अपघात गेल्या महिन्याभरापासून फरार असलेल्या होर्डिंग कापणाºया तिघांना पकडण्यात खंडणीविरोधी पथकाला यश मिळाले आहे़ रामदास सरोदे (रा. आष्टी), धनंजय भोळे (रा. बार्शी) आणि देवदास कोठारी (रा.लोहार, छत्तीसगड) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी आतापर्यंत ६ जणांना अटक करण्यात आली असून ठेकेदार मल्लिकार्जुन अजून फरार आहे.

जुना बाजार येथील शाहीर अमर शेख चौकात ५ आॅक्टोबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास झालेल्या रेल्वेच्या हद्दीतील मोठे होर्डिंग पडून त्याखाली सापडल्याने चार जणांचा मृत्यू झाला होता़ याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी रेल्वे अभियंता संजयसिंग विष्णुदेव (वय ४२, रा. विकासनगर, देहूरोड) आणि त्याच्या सहकारी पांडुरंग निवृत्ती वनारे (वय ५७, रा. कसबा पेठ) व त्यानंतर कॅप्शन अ‍ॅडव्हर्टायझिंग कंपनीचा मालक अब्दुल रज्जाक महम्मद खालिद फकिह (वय ५४, रा. अर्जुन मनसुखानी पथ, कोरेगाव रस्ता) यांना अटक केली होती़वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव यांच्या सूचनेनुसार मिळालेल्या माहितीनुसार घुगे व त्यांचे सहकारी हडपसर येथील वैभव टॉकीजसमोर गेले़ तेथे तिघे जण संशयास्पदरीत्या थांबलेले दिसून आले़ पोलिसांनी त्यांना घेरून ताब्यात घेतले़ त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी गुन्हा कबूल केला़ तिघांना बंडगार्डन पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे़याप्रकरणी निष्काळजीपणा दाखविल्याने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या घटनेनंतर होर्डिंग कोसळताना ते कापत असलेले तीनही कामगार पळून गेले होते़ खंडणीविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल घुगे व त्यांचे सहकारी हडपसर पोलीस ठाण्याच्या परिसरात १२ नोव्हेंबरला गस्त घालत होते़ त्यावेळी पोलीस हवालदार काळभोर यांना या कामगारांविषयी माहिती मिळाली होती़ 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात