शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; कार जळून खाक, तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 15:14 IST

कारमधील तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला...

निरगुडसर (पुणे) : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचरच्या दक्षिण बाजूला तीन किलोमीटर अंतरावर भोररवाडी तांबडे मळा (तालुका आंबेगाव) येथे आज सकाळी स्विफ्ट कार, टेम्पो व कंटेनरचा विचित्र अपघात झाला. या भीषण अपघातात स्विफ्ट कार जागीच जळून खाक झाली. कारमधील तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

सुदैवाने स्विफ्ट कारचा चालक व टेम्पोच्या चालक बचावला आहे. मृत झालेले तीन तरुण खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथील असल्याची माहिती प्राप्त होत आहे. अपघातानंतर या परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मंचरपासून जवळच असणाऱ्या भोरवाडी परिसरात पुणे - नाशिक महामार्गावर पुण्याच्या दिशेने जाणारा एक कंटेनर (GJ 01 WB 1737) बंद अवस्थेत उभा होता. त्याच ठिकाणी आज सकाळी टेम्पो (MH 12 QG 3351) व स्विफ्ट कार (MH 14 DT 0295) यांच्यात जोरदार धडक झाली.

धडक झाल्यानंतर टेम्पो पुढे जाऊन उभ्या असलेल्या कंटेनरला धडकला तर स्विफ्ट गाडीने पेट घेतला. त्यात स्विफ्ट गाडी पूर्णतः जळून खाक झाली आहे. या अपघातात स्विफ्ट गाडीतील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सुदैवाने स्विफ्ट कारचा चालक व टेम्पो चालक बचावले आहेत. मृत झालेल्या व्यक्तींचा तपशील अद्याप प्राप्त झालेला नाही. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे पोलीस उपनिरीक्षक सोमेश्वर शेटे पोलीस नाईक राजेंद्र हिले, नंदकुमार आढारीयंत्रणा याबाबत कसून चौकशी करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातMancharमंचरNashikनाशिक