शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime : न्यूड फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर तिघांकडून बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 18:37 IST

Pune Crime : पीडित तरुणीने याप्रकरणी पुणे येथील सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली

पिंपरी : जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवून तरुणीचे न्यूड फोटो व व्हिडिओ काढले. ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपळे गुरव येथे बुधवारी (दि. १५ डिसेंबर) ही घटना घडली. 

प्रथमेश उर्फ सनी खैरे, स्वराज कदम (दोघेही रा. पिंपळे गुरव) तसेच प्रथमेश याचा अनोळखी मित्र यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पीडित १९ वर्षीय तरुणीने याप्रकरणी पुणे येथील सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर सांगवी पोलीस ठाण्यात हा गुन्हा वर्ग करण्यात आला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रथमेश खैरे याने तरुणीला पिंपळे गुरव येथे बोलावून घेऊन तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. त्याचे न्यूड फोटो व्हिडिओ काढले. त्यानंतर प्रथमेश याचा मित्र स्वराज कदम हा तेथे आला. स्वराज यांने देखील पीडित तरुणीशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर पीडित तरुणी सायंकाळी सहाच्या सुमारास तेथून निघून गेली.

त्यानंतर आरोपींनी रात्री दहाच्या सुमारास पुन्हा फोन करून तरुणीला येण्यास सांगितले. मी येत नाही, असे पीडित तरुणीने सांगितले. त्यावेळी तरुणीचा न्यूड व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी आरोपींनी दिली. त्याला घाबरून फिर्यादी पीडित तरुणी पुन्हा आरोपींकडे रात्री साडेअकराला पोहोचली. त्यावेळी आरोपी प्रथमेश आणि त्याच्या अनोळखी मित्राने देखील फिर्यादीची जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. पीडित तरुणीने याप्रकरणी पुणे येथील सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर हा गुन्हा सांगवी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSangviसांगवीCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग