शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

उसन्या पैश्यांवरून तिघा जणांनी केला मित्राचा खून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 2:58 PM

दत्ता भोसले यांचा त्यांच्या राहत्या खोलीमध्ये खून करण्यात आला होता.

ठळक मुद्देभोसले यांच्या रूमचे मालक मिथुन कंद यांनी दिलेल्या फिर्याद

वाघोली : उसने पैसे घेऊन ते परत न देता शिवीगाळ व मारहाण करत असल्याने सणसवाडी येथील तीन मित्रांनी एकत्र येत आपल्या पेंटर मित्राचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या तिघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना २ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ता भोसले यांचा त्यांच्या राहत्या खोलीमध्ये खून करण्यात आला. या खूनप्रकरणी प्रमोद श्रीकांत काशीद (वय-२७,रा.बीड),अतुल नाथराव मुसळे (वय-२०,रा-लातूर) अमोल तानाजी चौधरी (वय-२६,रा-पंढरपूर सध्या तिघेही रा.सणसवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. या तीन मित्रांनी भोसले यांच्याकडून वेळोवेळी पैसे उसने घेतले होते. ते पैसे परत न देता शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याचा मनात राग मनात धरून २२ मार्च रोजी रात्री भोसले यांच्या राहत्या रूममध्ये चाकूने गळा चिरून  खून करण्यात आव्ला होता. बंद खोलीमधून उग्र वास येत असल्याने हा प्रकार उघडकीस आला. भोसले यांच्या रूमचे मालक मिथुन कंद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लोणीकंद पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी खुना संबंधित केलेल्या चौकशीत काशीद, मुसळे, चौधरी या तिघा जणांनीच खून केल्याचे निष्पन्न झाले. या आरोपींना पकडण्यासाठी पथके तयार करून लातूर, उस्मानाबाद येथे जाऊन तपास करून पोलिसांनी आरोपींना अटक केली. लोणीकंद पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस सुधीर तोरडमल,महेश चव्हाण,बाळासाहेब सकाटे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास केला.

टॅग्स :Puneपुणेwagholi/lonikand policeवाघोली/लोणीकंद पोलीसCrimeगुन्हाMurderखून