शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

पिस्तूल बाळगणाऱ्या तीन जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 8:40 PM

गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना चिंचवड पोलिसांनी जेरबंद केले.आरोपींकडून तीन गावठी बनावटीचे पिस्तूल व सहा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

ठळक मुद्देतीन गावठी बनावटीचे पिस्तूल, सहा जिवंत काडतुसे व दोन दुचाकी असा ३ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी : गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना चिंचवड पोलिसांनी जेरबंद केले.आरोपींकडून तीन गावठी बनावटीचे पिस्तूल व सहा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. दत्ता विठ्ठल आगलावे (वय २५, रा. वृंदावन कॉलनी, चिंचवडेनगर, चिंचवड), विकास भाऊ कदम (वय २५, रा. औंढे खुर्द, लोणावळा), किरण दत्तात्रय येवले (वय २५, रा. वाकसई, लोणावळा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, गुरुवारी चिंचवडेनगर येथील दगडोबा चौकात राहणारा गुन्हेगार दत्ता आगलावे हा मावळातील दोन गुन्हेगारांसोबत असून त्यांच्याकडे पिस्तूल आहे अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार दगडोबा चौक व चिंतामणी चौकात रात्री साडेदहा वाजता सापळा रचण्यात आला. त्यावेळी दोन दुचाकी येत असल्याचे आढळले. यातील पहिल्या दुचाकीवरील आगलावे ,कदम व येवले यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून तीन गावठी बनावटीचे पिस्तूल, सहा जिवंत काडतुसे व दोन दुचाकी असा ३ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, परिमंडल तीनचे उपायुक्त गणेश शिंदे,  सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल कुबडे, सहायक निरीक्षक सतीश कांबळे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसCrimeगुन्हा