सजगतेमुळे तिघांना अटक

By Admin | Updated: November 14, 2016 02:43 IST2016-11-14T02:43:35+5:302016-11-14T02:43:35+5:30

सजगतेमुळे तिघांना अटक

Three people arrested due to illusion | सजगतेमुळे तिघांना अटक

सजगतेमुळे तिघांना अटक

पिंपरी : प्राण्यांचे मांस घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेल्या टेम्पोचालकासह दोघांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे़ शनिवारी पहाटेच्या सुमारास टेम्पोत मांस भरून पाठीमागे भाजीपाल्याचे क्रेट भरून मांसाची वाहतूक केली जात होती़ अखिल भारतीय कृषी गो सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी टेम्पो पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला़ या प्रकरणी तन्वीर अहमद याकीन अली शेख (२३), जाकीर हुसेन अब्दुल हसन (३५) आणि सिराजद्दीन अन्सारी यारमहमंद अन्सारी (वय २५, सर्व रा़ कुरेशीनगर, मुंबई) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे़ याबाबत शिवशंकर यांनी फि र्याद दिली आहे़
शनिवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास शिवशंकरला एक टेम्पोमधून गोमांस घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली़ मिळालेल्या माहितीवरून शिवशंकरने मित्रांच्या मदतीने कोकणे चौक, रहाटणी
येथे टेम्पो अडविला़ चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली़ नंतर काही वेळानंतर टेम्पोत मांस असल्याची माहिती दिली़(प्रतिनिधी)

Web Title: Three people arrested due to illusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.