शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवी घटना! भीमा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन परप्रांतीय अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 13:41 IST

भीमा नदीत ६ जण पोहण्यासाठी गेले असता तिघे वाहून गेले

वरवंड : ता-दौंड  तालुक्यातील हातवळण येथील गुऱ्हाळ वरती काम करणाऱ्या मुलांचा दुर्दैवी अंत झाला आहे. दौंड तालुक्यातील हातवळण येथे भीमा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या सहा मुलांपैकी तीन मुले वाहून गेल्याची घटना शनिवारी घडली होती. दरम्यान तिघांपैकी एकाचा मृतदेह शनिवारी सापडला असून दोन मुलांचा मृत्यूदेह अद्यापही सापडले नव्हते. मात्र ते शोधण्यासाठी ग्रामस्थ व पोलिस यंत्रणा कस लागला होता रविवारी सकाळी 10 च्या सुमारास बाकीचे दोन मृतदेह सापडले एक मृतदेह हातवळण दुसरा कानगाव हद्दीत सापडले.          भिमानदीत पोहोण्यासाठी गेलेले सहा पैकी तिघे वाहून गेले. विशाल दिलेराम सिंग ( वय १६), निखिल नरेशसिंग कुमार (वय १५) व अमित रामेश्वर राम (वय १६) मुळ रा. आदवपुर जि. बिजनौर )अशी या मुलांची नावे आहेत.  दरम्यान, याबाबत मिळालेले  माहिती अशी की, हातवळण येथील वसंत विठठल फडके यांच्या गुऱ्हाळावर काम करणाऱ्या मजूर दिलेराम भस्सु सिंग (वय ४५) यांचा मुलगा विशाल, भाचा निखिल, मेव्हणीचा मुलगा अमित, देव, निपिलकुमार व  निरजकुमार असे सहा जण शनिवारी (दि ७) दुपारी हातवळण येथील भीमा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेले होते. मात्र यामधील तीघे जण नदीच्या पात्रात वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच भिमा नदीच्या पात्रात यवत व पाटस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

पोलिसांनी मासेमारी करणारे मच्छीमार यांच्या होडीतुन व ग्रामस्थांच्या मदतीने या मुलांच्या मृतदेह शोध कार्य सुरू केले ,मात्र बराच वेळ शोध कार्य केल्यानंतर कु. अमित याचा मृतदेह आढळून आला. त्याचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढुन  मांडवगण फराटा  येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात  उपचारासाठी दाखल केले मात्र गेले डॉक्टरांनी  अमित याला उपचारापुर्वी मृत झाल्याचे सांगितले. तसेच रविवारी विशाल व निखिल यांचा मृतदेह एकाचा हातवळण व दुसरा मृतदेह कांनगाव हद्दीत सापडला पोलीसांच्या मदतीने  व ग्रामस्थांच्या सहकार्य ने भिमा नदीच्या पात्रातील मृतदेह बाहेर काढण्यात आले व हे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी यवत येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठवण्यात आले आहे. घटनास्थळी पाटस पोलिस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पोलीस हवालदार सागर चव्हाण,पोलीस हवालदार भालेराव ,तंटाक्तीअध्यक्ष मंगेश फडके ग्रामस्थ उपस्थितीत होते.

टॅग्स :Puneपुणेriverनदीdaund-acदौंडDeathमृत्यूSocialसामाजिक