परभणीहून मित्राचा खून करून फरार तिघे लोणी काळभोर पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2023 06:22 PM2023-01-06T18:22:14+5:302023-01-06T18:22:25+5:30

पुढील कायदेशीर कारवाईसाठी हिंगोली जिल्हातील पुर्णा पोलीसांच्या ताब्यात दिले आहे

Three Loni Kalbhor absconders after murdering a friend from Parbhani are in the net of police | परभणीहून मित्राचा खून करून फरार तिघे लोणी काळभोर पोलिसांच्या जाळ्यात

परभणीहून मित्राचा खून करून फरार तिघे लोणी काळभोर पोलिसांच्या जाळ्यात

Next

लोणी काळभोर : परभणीहुन आठ दिवसापुर्वी मित्राचा खुन करुन फरार असलेले तिघे लोणी काळभोरपोलिसांच्या कार्यतप्तरतेमुळे पोलीसांच्या जाळ्यात अडकले आहेत. आदित्य इस्माईल शेख, मोहम्मद मुजाइद सिद्धीकी व नयुम चाँद शेख (रा. तिघेही करंजी ता. वसमत जि हिंगोली) ही त्या तीन आरोपींची नावे आहेत. दरम्यान लोणी काळभोर पोलिसांनी वरील तीनही आरोपींना अटक करुन, पुढील कायदेशीर कारवाईसाठी हिंगोली जिल्हातील पुर्णा पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. 

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार,गुरुवारी (दि. ५) रात्री अकराच्या सुमारास लोणी काळभोर रेल्वे स्थानकावर तीन तरुण एका खुनाबाबत चर्चा करत असल्याची माहिती, एका खबऱ्याने पोलिस हवालदार नितीन गायकवाड यांना दिली. ही माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ लोणी स्टेशनला जाऊन, माहिती घेण्यास सुरुवात केली. यावेळी रेल्वे स्थानकाच्या एका कोपऱ्यात तिघे चोरुन बसल्याचे आढळुन आले. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडे माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, तिघेही घाबरल्याचे आढळुन आले. त्या तिघांना घेऊन पोलिस ठाण्यात आणून विचारपुस केल्यावर तिघांनी केलेल्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना दिली. यावर वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी पुर्णा पोलीस स्टेशनला फोन केला व संबधित पोलिस ठाण्याच्या आधिकाऱ्यांशी वरील गुन्ह्याबाबत चर्चा केली असता, आदित्य इस्माईल शेख, मोहम्मद मुजाइद सिद्धीकी व नयुम चाँद शेख देत असलेल्या गुन्ह्याची माहिती खरी निघाली. 

पोलिस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलिस हवालदार नितीन गायकवाड व शैलेश कुदळे यांनी कार्यतत्परता दाखवत पळापळ केल्याने, खुना सारख्या गंभीर गुन्हातील आरोपी पोलिसांच्या हाती लागले. वरील उल्लेखनीय कामगीरी पोलिस आयुक्त रितेश कुमार,सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप कर्णीक, अप्पर पोलीस आयुक्त रंजन शर्मा उपायुक्त विक्रांत देशमुख, बजरंग देसाई, वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण सुभाष काळे (पोलीस निरीक्षक (गुन्हे)) यांच्या मार्गदर्शनाखाली अमित गोरे, पोलीस अंमलदार नितीन गायकवाड, पाटोळे, नागलोत,जाधव, देवीकर, पुंडे, वीर, शैलेश कुदळे, पवार, सोनवणे यांच्या पथकाने केली आहे.

Web Title: Three Loni Kalbhor absconders after murdering a friend from Parbhani are in the net of police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.