Pune Crime: किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत तिघांनी केला तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 01:07 PM2021-10-14T13:07:18+5:302021-10-14T13:07:26+5:30

चारचाकीला दुचाकीचा धक्का लागला या शुल्लक कारणांवरून भांडण करुन, चारचाकीतील तिघांनी तरूणांस हाताने लाथा बुक्क्यांनी व दगडाने मारुन त्याचा खुन केला

The three killed the youth in a minor altercation | Pune Crime: किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत तिघांनी केला तरुणाचा खून

Pune Crime: किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत तिघांनी केला तरुणाचा खून

Next

लोणी काळभोर : चारचाकीला दुचाकीचा धक्का लागला या शुल्लक कारणांवरून भांडण करुन, चारचाकीतील तिघांनी तरूणांस हाताने लाथा बुक्क्यांनी व दगडाने मारुन त्याचा खुन केला असल्याची घटना उरुळी कांचन - भवरापुर रोडवर बगाडे वस्ती येथे घडली आहे.

यामारहाणीत अक्षय अंकुश टिळेकर (वय २१,  रा. टिळेकरवाडी, ता. हवेली ) याचा खून झाला आहे. त्याचा मोठा भाऊ अमर अंकुश टिळेकर ( वय २४ रा. टिळेकरवाडी, ता. हवेली ) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून तिन अनोळखी इसमांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार,  बुधवारी रात्री ८ - ३० वाजण्याच्या सुमारांस अमर घरी असतांना चुलत भाऊ प्रशांत टिळेकर याने अक्षयला बगाडे मळ्याच्या पाटीपाशी तिघे मारहाण करीत असल्याचे कळवले. तो तातडीने चुलत भाऊ धमेंद्र यास घेऊन घटनास्थळी पोहोचला.

तेथे लोक जमा झाले होते. त्यावेळी अक्षय यास मारणारे तिघे कारमध्ये बसताना अमरने पाहिले. ते भवरापुरचे दिशेने निघून गेले. त्यावेळी अमरसह काही जणांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग केला. गाडी वेगात गेल्याने त्यांना थांबवता आली नाही. त्यानंतर अमरने लोकांकडे विचारपूस केली.  दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून भांडण करत कारमधील तिघांनी अक्षय मारलं असल्याचे लोकांनी सांगितले. अक्षय रस्त्याच्या कडेला निपचीत पडला होता. त्यांस रूगणवाहिकेतून उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उरुळी कांचन येथे नेले. तेथे सुविधा नसल्याने खाजगी रूग्णालयात नेण्यात आले. सदर ठिकाणी तपासणी करुन डॉक्टरांनी अक्षयचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार हे करत आहेत.

Web Title: The three killed the youth in a minor altercation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.