शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सुसाट वेगातील ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तिघे ठार, आईसह लहान बाळाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 21:51 IST

सुसाट वेगाने तो पिरंगुटच्या दिशेने आला तेव्हा येताना त्याने तीन ते चार चारचाकी वाहनांना धडक देखील दिली

पुणे/पिरंगुट : पिरंगुट (ता,मुळशी) नजदीक असलेल्या लवळे फाटा येथे ट्रक व दुचाकी याचा अपघात झाला असून या अपघातामध्ये तीन व्यक्तींचा मृत्यू झाला. तर, एक व्यक्ती जखमी झालेला आहे. यामध्ये रेश्मा (वय २५ वर्ष) या महिलेचा व त्यांचा मुलगा रिवांश पवन पटेल (वय सहा महिने ) या बालकाचा मृत्यू झाला आहे. महिलेचे पती पवन रमेश पटेल (वय ३२ वर्षे) हे जखमी झाले आहेत तर नांदे गावचे रहिवासी तानाजी विठ्ठल ढमाले (वय वर्ष अंदाजे ३० ते ३५ वर्ष) यांचादेखील या अपघाता दरम्यान मृत्यू झाला आहे.

या दुर्घटने बाबतचे सविस्तर वृत्त असे की, पुण्याकडून पौडच्या दिशेने फरशी भरलेला (एम.एच.12 के.आर 7706) मालवाहू ट्रक जात असताना हा ट्रक पिरंगुट घाटामध्ये आला तेव्हा या ट्रकचे ब्रेक निकामी झाले असावेत  अथवा इतर बिघाड झाला असावा. कारण हा ट्रक पिरंगुट घाटामध्ये आल्यानंतर सुसाट वेगाने तो पिरंगुटच्या दिशेने आला तेव्हा येताना त्याने तीन ते चार चारचाकी वाहनांना धडक देखील दिली. परंतु सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, हा ट्रक बरोबर लवळे फाटा येथील बस स्टॉप समोर आल्यानंतर ट्रकचालकाने (शशिकांत बाबू मांडवे उरुळी कांचन वय २३ वर्ष ) रस्ता सोडून डाव्या बाजूला हा ट्रक घातला. तेव्हा या धांदली दरम्यान त्याच्यासमोरून दुचाकीवरून पिरंगुट येथील बँक ऑफ बडोदाचे मॅनेजर पवन पटेल तसेच त्यांच्या पत्नी व मुलगा हे तिघे चालले असताना त्यांची दुचाकी या ट्रकच्या खाली आली. या दुर्देवी अपघातात पवन रमेशराव पटेल हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पत्नी रेश्मा पवन पटेल व छोटा मुलगा रिवांश पवन पटेल यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तेव्हा जखमी पवन पटेल यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी, जवळच दुचाकीवर असलेले तानाजी विठ्ठल ढमाले हे देखील ट्रकच्या खाली आल्याने त्यांचादेखील या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुदैवाने हा ट्रक ज्या ठिकाणी उभा राहिला त्या ठिकाणी बांधकाम चालू असल्याने वाळूचा ढीग होता. त्या वाळूच्या अडथळ्यामुळे हा ट्रक जाग्यावरती उभा राहिला व पुढील आणखी मोठा अनर्थ टाळला. तेव्हा तातडीने ट्रक चालकास त्या ठिकाणी उभे असलेले माऊली भालके व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या दुर्घटनेनंतर या ठिकाणी काही काळ ट्रॅफिक जाम झाले होते, पौड पोलिस व नागरिकांच्या सहकार्यामुळे येथील ट्रॅफिक लवकरच सुरळीत करण्यात आले. 

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणेDeathमृत्यू