शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

पुणे परिसरात दोन अपघातांत तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 3:20 AM

भरधाव वेगातील दुचाकीचा ताबा सुटून झालेल्या अपघातात दोघा युवकांचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई द्रुतगती मार्गावर वारज्यातील मुठा नदीच्या पुलावर घडली. कोंढव्यात झालेल्या अपघातात एका इसमाच्या रॅश ड्रायव्हींगमुळे एका युवकाने आपले प्राण गमावले.

पुणे : भरधाव वेगातील दुचाकीचा ताबा सुटून झालेल्या अपघातात दोघा युवकांचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई द्रुतगती मार्गावर वारज्यातील मुठा नदीच्या पुलावर घडली. कोंढव्यात झालेल्या अपघातात एका इसमाच्या रॅश ड्रायव्हींगमुळे एका युवकाने आपले प्राण गमावले. हे दोनही अपघात सोमवारी पहाटे साडेतीन ते पावणेचारच्या सुमारास घडले आहेत.अजिंक्य शरद डुंबरे (वय २६, रघुनंदन कॉम्पलेक्स, विठ्ठलवाडी) आणि नकुल नवनीत परमार (वय २८, रा. रामबाग लेन, बोरिवली वेस्ट मुंबई) यांचा अपघातात मृत्यू झाला. निकम हे दुचाकी चालवत होते. वारजे पुलाकडून धायरीच्या दिशेने जात असताना भरधाव वेगात असलेल्या दुचाकीवरील त्यांचा ताबा सुटला. ही घटना सोमवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास घडली. त्यात दोघांचाही मत्यू झाल्याचे वारजे पोलिसांनी सांगितले.कोंढवा लुल्लानगर रस्त्यावर कुबेर कॉलनी समोर पहाटे साडेतीनच्या सुमारास झालेल्या अपघातात फिरोज मेहबुब शेख (वय २२, साईबाबानगर कोंढवा) याला आपले प्राण गमवावे लागले. सादीक अन्सारी (वय २०, रा, कोंढवा) यांनी या प्रकरणी कोंढवा पोलिसांत फिर्याद दिली आहे.या प्रकरणी कल्याणी शरणप्पा घोटमाळे (वय ३६, रा. गंगानगर स्माशानभूमी हडपसर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अन्सारी हे, त्यांचे मित्र फिरोज शेखव इरफान शेख यांच्यासह मोटारसायकलवरुन पहाटे साडेतीनच्या सुमारास कोंढवा लुल्लानगर रस्त्यावरुन चालले होते. त्यावेळी घोटमाळे यांनी त्यांच्या दुचाकी जवळून त्यांची मोटारसायकल वेगात नेली. त्यावेळी घोटमाळे यांच्या दुचाकीचा धक्का लागल्याने फिर्यादी यांच्यासह फिरोज आणि इरफान देखील गाडीवरुन खाली पडले.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे