शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-सातारा रोडवर ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, पाच जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 08:38 IST

पुणे-सातारा रोडवर झाला भीषण अपघात शिंदेवाडी येथील किर्लोस्कर कंपनीसमोर झाला भीषण अपघात

पुणे - पुण्यातील तळजाई पठार येथील तरुण शिवापूर येथील दर्ग्याच्या दर्शनाला मोटारसायकलवरुन जात होते.  ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला दिलेल्या धडकेत तिघांचा मृत्यु झाला असून ५ जण जखमी झाले आहेत. हा अपघातपुणे-सातारा रोडवरील शिंदेवाडी येथील किर्लोस्कर कंपनीसमोर पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास घडला. हे सर्व तरुण तळजाई येथील राहणारे आहेत. अनिकेत भारत रणदिवे (वय २३), सुशील गोपाळ कांबळे (वय २३, रा. तळजाई पठार) आणि सुरज काका शिंदे (वय २४)अशी अपघातात मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत.अनिकेत रणदिवे, करण जाधव, राकेश क-हाडे, अमर कांबळे, चेतन लोखंडे अशी जखमी झालेल्यांची नावे असून त्यांना ससेवाडी येथील श्र्लोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याबाबतची माहिती अशी, तळजाई पठार परिसरात राहणाऱ्या या मित्रांनी सोमवारी रात्री पार्टी केली. त्यानंतर त्यांचे शिवापूर येथील दर्ग्याच्या दर्शनाला जायचे ठरले. मध्यरात्री साडेबारा वाजता  ३ मोटारसायकलवरुन ८ जण निघाले. सातारा रोडवरील शिंदेवाडी येथे आले असताना पाठीमागून सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकची त्यांच्या तीनही मोटारसायकलला धडक बसली. त्यात ८ जण जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या श्र्लोक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यात दोघांचा उपचारापूर्वीच मृत्यु झाला असून उपचार सुरु असताना अनिकेत रणदिवे याचा मृत्यू झाला.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघात