कोरोनामुळे भिमाशंकर येथे साजरी होणारी तीन दिवसीय महाशिवरात्र यात्रा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 04:55 PM2021-02-27T16:55:21+5:302021-02-27T16:56:33+5:30

राज्याचे कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या निमित्ताने भाविकांना आवाहन केले.

Three-day Mahashivratra Yatra of Bhimashankar cancelled due to corona | कोरोनामुळे भिमाशंकर येथे साजरी होणारी तीन दिवसीय महाशिवरात्र यात्रा रद्द

कोरोनामुळे भिमाशंकर येथे साजरी होणारी तीन दिवसीय महाशिवरात्र यात्रा रद्द

Next

भिमाशंकर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. त्याच अनुषंगानेराज्य सरकारकडून सामाजिक, धार्मिक, राजकीय अशा सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना निर्बंध घालण्यात आले आहे. त्याच धर्तीवर प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दि.१० फेब्रुवारी ते ११, १२ मार्च दरम्यान साजरी होणारी महाशिवरात्र यात्रा रद्द करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय प्रशासन व देवस्थान यांनी संगनमताने घेतला आहे. 

प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकरमहाशिवरात्रीच्या निमित्ताने दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी गर्दी करता असतात. तसेच तीन दिवसांच्या यात्रेचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात येते. मात्र, यंदा कोरोनाचे सावट असल्याने ही यात्रा रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तसेच १० ते १२ मार्च या कालावधीत भीमाशंकर व आजुबाजूच्या गावांमध्ये कडक संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. 


राज्याचे कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या निमित्ताने भाविकांना आवाहन केले आहे. १० ते १२ मार्च या तीन दिवसांत भाविकांनी भीमाशंकरला येऊ नये. शिवभक्तांनी आपल्या घरीच भगवान शिवशंकराची प्रार्थना करावी,असेही पाटील यांनी यावेळी सांगितले. 

Web Title: Three-day Mahashivratra Yatra of Bhimashankar cancelled due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.