शहरं
Join us  
Trending Stories
1
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
2
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
3
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
4
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
5
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
6
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
7
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
8
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
9
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
10
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
11
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
13
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
14
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
15
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
16
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
17
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
19
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
20
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली

महापालिकेत दोन वर्षांत ‘तीन’ महाघोटाळे  : श्रीनाथ भिमाले यांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 21:00 IST

महापालिकेच्या वतीने गेल्या दोन वर्षांत राबविलेल्या ‘पुणे कनेक्ट’, ‘एलईडी लाईट प्रकल्प’, आणि ‘डेटा करप्ट’ हे तीन महाघोटाळे झाले असल्याची कबुली महापालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देडेटा करप्ट झाला असून  यामुळे महापालिकेचे अंदाजपत्रक कोलमडण्याची शक्यताकुणाल कुमार यांच्या साडे तीन वर्षांच्या कार्यकाळात आणलेले अनेक प्रकल्प सध्या वादात याप्रकरणात दोषी असणा-या अधिका-यांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी

पुणे: महापालिकेच्या वतीने गेल्या दोन वर्षांत राबविलेल्या ‘पुणे कनेक्ट’, ‘एलईडी लाईट प्रकल्प’, आणि नुकताच उघडकीस आलेला ‘डेटा करप्ट’ हे तीन महाघोटाळे झाले असल्याची कबुली महापालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. महापालिकेचा पुणे कनेक्ट प्रकल्पामध्ये ८० लाख रुपये जादा देण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. याप्रकरणी जबाबदार असणा-या सर्व अधिका-यांवर कडक कारवाईची मागणी भिमाले यांनी केली आहे.     तत्कालीन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी आपल्या साडे तीन वर्षांच्या कार्यकाळात आणलेले अनेक प्रकल्प सध्या वादात सापडले आहेत. यामध्ये महापालिकेचा सर्व कारभार आॅनलाईन करण्यासाठी व पारदर्शक करण्यासाठी तातडीन आलेली ‘पुणे कनेक्ट’ योजना असो, शहराची लाईट बचत करण्यासाठी आणलेली ‘एलईडी’ योजना आणि आता डेटा करप्टचे प्रकरण समोर आले आहे. यात आयटी शहर असलेल्या पुणे महापालिकेने  डेटा ठेवण्यासाठी नाशिकच्या खाजगी कंपन्यांकडुन सुविधा घेण्यात आली होती. महापालिकेचा डेटा करप्ट झाला असून  यामुळे महापालिकेचे अंदाजपत्रक कोलमडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.    महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या प्रमुख उपस्थित सर्व प्रमुख अधिकारी, पदाधिका-यांची बैठक सोमवारी घेण्यात आली. यामध्ये आयुक्ताच्या अनुपस्थित झालेल्या सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा झालेल्या डेटा करप्ट प्रकरण, कॅनोल फुटी दुर्घटना, एलईडी प्रकरणांबाबत चर्चा करण्यात आली.  यावेळी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले व उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंड देखील उपस्थित होते. शहरामधील रस्त्यांवर एलइडी बसवण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. याप्रकल्पा संदर्भात थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडुन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तर डेटा करप्ट विषयी विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. महापालिकेची माहिती एका खासगी कंपगीकडे  ठेवण्यात येते. हेच मुळात चुकीची गोष्ट आहे. यामुळे आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे. महापालिकेचा टेंडर विभागाचे नियंत्रण गुजरातमधील अहमदाबाद येथील एका कंपनीकडुन करण्यात येते. त्यामुळे ही माहिती चोरीला जावू शकते असा आरोप विरोधकांनी केला आहे.    याविषयी भिमाले म्हणाले, महापालिका २०१६ पर्यंत सर्व माहिती स्वत:च्या सर्व्हरमध्ये साठवूण ठेवत होती. पंरतु त्यानंतर ‘पुणे कनेक्ट’ प्रकल्पाअंतर्गत सर्व्हर भाडेतत्वावर घेण्यात आले. यासाठी दर महिन्याला २३ लाख ५० हजार रुपयांचा खर्च करण्यात आला. राज्य शासनाने क्लाऊड रेट कॉन्ट्रक्ट चे दर ठरवून दिले असताना सुध्दा वाढीव दराने खरेदी करण्यात आली. यामध्ये करण्यात आलेले व्यवहारावर भिमाले यांनी संशय व्यक्त केला आहे. याबाबत आयुक्तांनी शासकीय अभियांत्रिकी संस्थेकडुन चौकशी करण्यासंदर्भात सांगितले असल्याचे भिमाले म्हणाले.    सत्ताधारी भाजपने याप्रकल्पावर संशयाची सुई उगारली आहे. त्यामुळे याप्रकरणात दोषी असणा-या अधिका-यांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांच्या प्रकल्पांवर आता संशय घेण्यात येत आहे. पुणे कनेक्टचे काम तत्कालीन आयुक्तांनी त्यांच्या अधिकारामध्ये दिले असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाShrinath Bhimaleश्रीनाथ भिमालेBJPभाजपा