शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

तिघांना अटक : डोक्यात दगड घालून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 2:42 AM

मित्रांच्या पत्नीला शिवीगाळ करीत असल्याच्या रागातून तीन मित्रांनी एका मित्राच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला़ याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी १२ तासांच्या आत तिघांना अटक केली आहे.

पुणे : मित्रांच्या पत्नीला शिवीगाळ करीत असल्याच्या रागातून तीन मित्रांनी एका मित्राच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला़ याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी १२ तासांच्या आत तिघांना अटक केली आहे़ ही घटना रविवारी रात्री पानशेत धरण परिसरातील मौसे गावाजवळ घडली़योगेश हरिभाऊ ढोणे (वय २५, रा़ कामठेवस्ती, शिवणे) असे खून झालेल्याचे नाव आहे़ याप्रकरणी गणेश बाळासाहेब कवळे (वय २०, रा़ शिवणे), भूषण विजय गायकवाड (वय २३, रा़ रामनगर, वारजे माळवाडी), आणि मंदार अशोक शिंदे (वय २७, रा़ रामनगर, वारजे माळवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़पोलीस संतोष सावंत यांना खुनाबाबत माहिती मिळाली होती़ त्यावरून पोलीस पथकाने गणेश कवळे याला ताब्यात घेतले़ त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने खुनाची कबुली दिली़ योगेश ढोणे व इतर तिघे हे मित्र असून, योगेश हा मित्रांच्या पत्नीला अपशब्द वापरत होता़ यावरून त्यांच्यात वाद झाला होता़ या रागातून तिघांनी योगेश याला खडकवासला भागात नेले़ तेथे त्याला दारू पाजली़ त्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा मृतदेह निर्जन ठिकाणी टाकून दिला़ ही माहिती मिळाल्यावर पोलिसांनी आरोपीला घेऊन शोध घेतल्यावर वेल्हे तालुक्यातील मोसे गावाजवळ योगेशचा मृतदेह मिळून आला़पोलिसांनी त्यानंतर इतर दोघांना ताब्यात घेतले़ ही घटना वेल्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत आल्याने अधिक तपासासाठी तिघांना ताब्यात दिले आहे़ दरम्यान, योगेश ढोणे हा रात्रभर घरी आला नाही़ तो पालखीला गेला असावा, असे समजून त्याच्या नातेवाइकांनी त्याचा शोध घेतला नाही की, पोलिसांकडे तक्रार दिली नव्हती़ सिंहगड पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरुन हा गुन्हा उघडकीस आणला़

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हा