शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

गुजरातहून आलेला साडे तीन हजार किलो भेसळयुक्त खवा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 9:39 PM

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून उत्सवाच्या कालावधीत गुजरात येथून ट्रॅव्हल बसमधून साडेचार लाख रुपयांचा साडेतीन हजार किलो भेसळयुक्त खवा गुन्हे शाखेने सोमवारी पकडला़.

ठळक मुद्देअमरावतीला पाठविला जाणार होता

पुणे : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून उत्सवाच्या कालावधीत गुजरात येथून ट्रॅव्हल बसमधून साडेचार लाख रुपयांचा साडेतीन हजार किलो भेसळयुक्त खवा गुन्हे शाखेने सोमवारी पकडला़. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाची मदत घेण्यात आली़ भावेश पटेल (रा. अहमदाबाद) याच्यासह तीन ट्रॅव्हल्स चालकांना पुढील कारवाईसाठी सहकारनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.    गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सराईतांची तपासणी तसेच अवैध्य गोष्टींवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यादरम्यान गुन्हे शाखा युनिट एकचे कर्मचारी सचिन जाधव यांना गुजरातमधून ट्रॅव्हल्सने भेसळयुक्त खवा पुण्यात आणल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने पद्मावती येथे थांबलेल्या ट्रॅव्हल्सजवळ सापळा रचला़ . अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी प्रशांत गुंजाळ, कुलकर्णी, स्वाती म्हस्के तेथे आले. तपासणीत खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसमधून आलेला साडे तीन हजार किलो खवा मिळाला. तपासात हा खवा अहमदाबाद येथून पटेल यांने ट्रॅव्हल्समध्ये ठेवून अमरावतीला जात होता. पुण्यातून तो दुसऱ्या ट्रॅव्हलने जाणार असल्याचे सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी सखवा जप्त केला. तसेच, पुढील कारवाईसाठी भावेश पटेल व ट्रॅव्हल्स चालकांना एफडीएच्या ताब्यात दिले. ही कारवाई पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, उपनिरीक्षक हर्षल कदम, दिनेश पाटील, सचिन जाधव, इरफान मोमीन, श्रीकांत वाघवले, तुषार माळवदकर, रिजवान जिनेडी, तुषार खडके, गजानन सोनुने यांनी केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकGujaratगुजरात