गुजरातहून आलेला साडे तीन हजार किलो भेसळयुक्त खवा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 21:41 IST2018-09-10T21:39:07+5:302018-09-10T21:41:44+5:30
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून उत्सवाच्या कालावधीत गुजरात येथून ट्रॅव्हल बसमधून साडेचार लाख रुपयांचा साडेतीन हजार किलो भेसळयुक्त खवा गुन्हे शाखेने सोमवारी पकडला़.

गुजरातहून आलेला साडे तीन हजार किलो भेसळयुक्त खवा जप्त
पुणे : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून उत्सवाच्या कालावधीत गुजरात येथून ट्रॅव्हल बसमधून साडेचार लाख रुपयांचा साडेतीन हजार किलो भेसळयुक्त खवा गुन्हे शाखेने सोमवारी पकडला़. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाची मदत घेण्यात आली़ भावेश पटेल (रा. अहमदाबाद) याच्यासह तीन ट्रॅव्हल्स चालकांना पुढील कारवाईसाठी सहकारनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सराईतांची तपासणी तसेच अवैध्य गोष्टींवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यादरम्यान गुन्हे शाखा युनिट एकचे कर्मचारी सचिन जाधव यांना गुजरातमधून ट्रॅव्हल्सने भेसळयुक्त खवा पुण्यात आणल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने पद्मावती येथे थांबलेल्या ट्रॅव्हल्सजवळ सापळा रचला़ . अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी प्रशांत गुंजाळ, कुलकर्णी, स्वाती म्हस्के तेथे आले. तपासणीत खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसमधून आलेला साडे तीन हजार किलो खवा मिळाला. तपासात हा खवा अहमदाबाद येथून पटेल यांने ट्रॅव्हल्समध्ये ठेवून अमरावतीला जात होता. पुण्यातून तो दुसऱ्या ट्रॅव्हलने जाणार असल्याचे सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी सखवा जप्त केला. तसेच, पुढील कारवाईसाठी भावेश पटेल व ट्रॅव्हल्स चालकांना एफडीएच्या ताब्यात दिले.
ही कारवाई पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, उपनिरीक्षक हर्षल कदम, दिनेश पाटील, सचिन जाधव, इरफान मोमीन, श्रीकांत वाघवले, तुषार माळवदकर, रिजवान जिनेडी, तुषार खडके, गजानन सोनुने यांनी केली.