शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा साडेतीन लाख ज्येष्ठांना लाभ; सुमारे २ लाख अर्ज अपात्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 15:24 IST

जिल्हानिहाय लाभार्थ्यांमध्ये सर्वाधिक लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील ३५ हजार ९८७ जणांना मिळाला आहे

पुणे : ज्येष्ठ नागरिकांना एकरकमी ३ हजार रुपये बचत खात्यात थेट वितरण करण्यासाठी राज्यात राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेत आतापर्यंत सुमारे साडेतीन लाख जणांना लाभ मिळाला आहे. लाभार्थ्यांमध्ये पुणे आणि नागपूर विभागातील ज्येष्ठांचा सहभाग सर्वाधिक आहे. या योजनेत आतापर्यंत १८ लाखांहून अधिक अर्ज आले आहेत. त्यातील १३ लाखांपेक्षा जास्त अर्जांना मंजुरी मिळाली आहे. सुमारे २ लाख अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत. जिल्हानिहाय लाभार्थ्यांमध्ये सर्वाधिक लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील ३५ हजार ९८७ जणांना मिळाला आहे.

२ लाख अर्ज अपात्र

राज्यात आतापर्यंत १८ लाख ७३ हजार ६९४ अर्ज आले आहेत. त्यातील १३ लाख ६७ हजार ३७५ अर्जांना मान्यता देण्यात आल्याची माहिती समाजकल्याण विभागाकडून देण्यात आली, तर लाख ५ हजार ७०२ अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत. जिल्हा व महापालिकास्तरीय समित्यांकडे ३ लाख ६१७ अर्ज मंजुरीसाठी प्रलंबित आहेत. ११ लाख ९२ हजार ७५८ अर्जांची माहिती पोर्टलवर टाकण्यात आली आहे. आधार जोडणीचे काम झाल्यानंतर अर्जदारांना लाभ देण्यात येत आहे.

सर्वाधिक लाभार्थी पुणे विभागात

लाभार्थ्यांमध्ये सर्वाधिक ६९ हजार ८६६ जण पुणे विभागातील आहेत. त्याखालोखाल ६९ हजार ८६१ लाभार्थी नागपूर विभागातील आहेत. मुंबई विभागातून ३५ हजार ५१०, नाशिक ४३ हजार ९१२, अमरावती ५३ हजार ६१, संभाजीनगर ३२ हजार ८०१, तर लातूर विभागातून ४२ हजार ५९९ जणांना लाभ मिळाला आहे.

जिल्हा लाभार्थी

मुंबई शहर : २३४मुंबई उपनगर : १,२०८ठाणे : ३,९९२पालघर : २,६८५रायगड : ८,३५३रत्नागिरी : ६,९९१सिंधुदुर्ग : १२,०४७नाशिक : ७,६०६धुळे : ५६०६नंदुरबार : ४,४३१जळगाव : १२,९२६अहिल्यानगर : १३,३४३पुणे : १०,२८३सांगली : ६,४६७सातारा : ११,२६२सोलापूर : ५,८७६कोल्हापूर : ३५,९८७अमरावती : ११,९८१बुलढाणा : १३,००४अकोला : ११,१९३वाशिम : ५,४५२यवतमाळ : ११,४३१नागपूर : ११,३४३वर्धा : ७,९०४भंडारा : १२,६३४गोंंदिया : १३,२९१चंद्रपूर : ११,६३२गडचिरोली : १३,०५७संभाजीनगर : ४,७३०बीड : ११,३३३परभणी : १२,६२४लातूर : १२,९०४नांदेड : १०,८२४धाराशिव : ११,८३५

एकूण : ३,४७,६१०

टॅग्स :PuneपुणेSenior Citizenज्येष्ठ नागरिकMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMONEYपैसाPensionनिवृत्ती वेतन