शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अदृश्य शक्तीमुळेच निवडणूक काळात धमक्या व पैसे देण्याचे प्रकार - सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 16:32 IST

शरद पवार यांनी सहा दशके प्रेम व विश्वासाने जोडली होती, त्याला गालबोट लावायच काम अदृश्य शक्तीमुळे झाले

इंदापूर  : ऐन निवडणुकीच्या काळात राज्यात धमक्या व मतदारांना पैसे देण्याचे जे प्रकार अनुभवास आले. अदृश्य शक्तीमुळेच हे प्रकार घडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण गलिच्छ झाले आहे. हे चित्र अस्वस्थ करणारे व वेदना देणारे आहे,अशी प्रतिक्रिया बारामती लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार खा.सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. लोकसभेच्या निवडणुकीचे मतदान चालू असताना त्यांनी इंदापूर शहरास भेट दिली. मतदानाच्या सद्यस्थितीबद्दल माहिती घेतल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.    त्या म्हणाल्या की, ज्या म.गांधी यांच्या नेतृत्वाखाली लोकांनी देश स्वातंत्र्यासाठी एकत्र येवून लढा दिला त्या देशात व छ.शिवाजी महाराज, शाहू,फुले, आंबेडकर,यशवंतराव चव्हाण यांच्या महाराष्ट्राला अदृश्य शक्तीने दृष्ट लावली आहे. ज्यांच्याकडे सत्ता व पैसे आहेत त्यांनी भिती दाखवली तर लोक घाबरतात. सशक्त लोकशाहीमध्ये हे किती वाईट आहे. देश दडपशाहीकडे चालला आहे का? मनी व मसल्स हा प्रकार महाराष्ट्रात पहिल्यांच पहायला मिळतोय ही वेदना देणारी गोष्ट आहे. त्याचा व्होटिंग बँकवर किती परिणाम होईल या प्रश्नाला उत्तर देताना ते काळच ठरवेल असे त्या म्हणाल्या. कालचा प्रकार पहाताना टीव्ही सिरियल पहाते की सिनेमा बघते,असे मला वाटत होते. मला विश्वासच बसत नाही. इतक्या प्रेमाने जी नाती आपण जपून ठेवली होती. शरद पवार यांनी सहा दशके प्रेम व विश्वासाने जोडली होती. त्याला गालबोट लावायच काम अदृश्य शक्तीमुळे झाले आहे, असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरbaramati-pcबारामतीbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४