शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

अपघातांमुळे वर्षभरात हजार विद्यार्थ्यांचा मृत्यू; सुरक्षेचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 05:33 IST

दरवर्षी राज्यातील शाळांमधील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांचा अपघाताने मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुणे : दरवर्षी राज्यातील शाळांमधील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांचा अपघाताने मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रामुख्याने वाहन अपघात, पाण्यात बुडून आणि साप चावल्याने हे मृत्यू होत आहेत. त्यामुळे सर्व शाळांनी विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी, या बाबतच्या सूचना प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयातर्फे देण्यात आल्या आहेत.राज्य शासनातर्फे काही वर्षांपासून अपघातग्रस्त विद्यार्थ्यांसाठी ‘राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना’ राबविली जात आहे. पूर्वी खासगी विमा कंपनीमार्फत अपघातग्रस्त विद्यार्थ्यांच्या कुंटुंबियांना या योजनेंतर्गत आर्थिक मदत केली जात होती. अपघातामुळे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना २०११ पासून शासनाने ७५ हजार रुपयांचा निधी देण्यास सुरूवात केली. अपघाताच्या तीव्रतेनुसार विद्यार्थ्यांना ५० ते ३० हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. शासनातर्फे २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात १ हजार ६९ तर २०१८-१९ या वर्षात १,१९० अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. त्यातील ८० टक्के विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर २० टक्के विद्यार्थ्यांना अपघात झाल्याने त्यांना अपंगत्व आले.अपघातामुळे मृत्यू होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागाने नुकतीच पुण्यातील गटशिक्षण अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात सर्व शाळांनी विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष द्यावे, अशा सूचना करण्यात आल्या. अपघातामध्ये दोन डोळे किंवा दोन्ही गेल्यामुळे अपंगत्व आलेल्या विद्यार्थ्यांना ५० हजार रुपये तर एक डोळा किंवा हात निकामी झाल्यास विद्यार्थ्यांला ३० हजार रुपये अनुदान दिले जाते. रस्त्यावरील अपघातामुळे मृत्यूमुखी पडणाºया विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे शाळांनी रस्त्याचे नियम, पाणी, साप आदींबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी, अशा सूचनाही प्राथमिक शिक्षण विभागाने शाळांना दिल्या आहेत.