शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

पुण्यात मास्क बंधनकारक करणार; वापर न केल्यास हजार रुपये दंड आकारणार : अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 13:49 IST

पुणे, पिंपरी-चिंचवडकरांना मास्क बंधनकारक करणार

ठळक मुद्देकोरोनाविरूद्धच्या या लढाईत सातत्य टिकवले तरच रुग्ण आढळण्याचा आलेख खाली उतरेल

पुणे (पिंपरी) : महाराष्ट्रातील काही भागात अद्यापही मास्कचा वापर केला जात नाही. पुणे, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यात मास्क बंधनकारक करून मास्कचा वापर न केल्यास हजार रुपये दंड आकारण्याबाबत विचार सुरू आहे. त्याबाबत बैठकीत चर्चा करू, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिंचवड येथे आटो क्लस्टर प्रदर्शन केंद्रात उभारलेल्या कोविड केअर सेंटरचे उद्धाटन शुक्रवारी झाले. त्यावेळी पवार बोलत होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर उषा ढोरे, आमदार चंद्रकांत पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख,  पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, महापालिकचे सत्ताधारी पक्षनेते नामदेव ढाके आदी या वेळी उपस्थित होते.उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोरोनाला रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढले पाहिजे. पिंपरी-चिंचवड ही कष्टकऱ्यांची नगरी आहे. येथील नागरिकांना किफायतशीर दरात उपचार मिळाला पाहिजे. ग्रामीण भाग देखील आपलाच आहे. त्यामुळे या कोविड सेंटरमध्ये खेड, जुन्नर, शिरूर, मावळ यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील देखील रुग्ण दाखल केले जातील. कोरोनाविरूद्धच्या या लढाईत सातत्य टिकवले तरच रुग्ण आढळण्याचा आलेख खाली उतरेल. 

एक लाखापेक्षा जास्तीच्या बिलांची पडताळणीअव्वाच्यासव्वा बिले आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. एक लाखांपेक्षा जास्तीचे बिल असल्यास त्याची पडताळणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यासाठी एक समिती नियुक्त केली आहे. त्यामुळे सामान्य रुग्णांना दिलासा मिळण्यास मदत होत आहे, असे अजित पवार यावेळी म्हणाले.

बैठकीत ठरणार धोरणकोविड सेंटरच्या उद्घाटनाच्या भाषणात बोलताना अजित पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. महाराष्ट्रात काही भागात मास्कचा वापर नागरिकांकडून होत नाही. त्यांना मास्क बंधनकारक केले पाहिजे. याबाबत दुपारी पुणे येथे बैठक होणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यात मास्कचा वापर न केल्यास हजार रुपये दंड आकरण्याचा विचार सुरू आहे. बैठकीत त्याबाबत चर्चा करू.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याAjit Pawarअजित पवारhospitalहॉस्पिटलPoliceपोलिसcommissionerआयुक्त