शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

नोकरीच्या आशेने हजारो जीव कुडकुडणाऱ्या थंडीत रस्त्यावर झोपतात तेव्हा... !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2019 4:24 PM

पोटाची भूक ही अनेकदा माणसाला काहीही करायला भाग पाडते असं म्हटलं जात. याच भुकेसाठी अर्थात नोकरीसाठी पुण्यातील रेसकोर्स मैदानावर थोडे थोडके नव्हे तर हजारो तरुणांनी रस्त्यावरील कुडकुडणाऱ्या थंडीत रात्र काढली

पुणे :पोटाची भूक ही अनेकदा माणसाला काहीही करायला भाग पाडते असं म्हटलं जात. याच भुकेसाठी अर्थात नोकरीसाठी पुण्यातील रेसकोर्स मैदानावर थोडे थोडके नव्हे तर हजारो तरुणांनी रस्त्यावरील कुडकुडणाऱ्या थंडीत रात्र काढली. केवळ मैदानावर नव्हे तर आजूबाजूच्या रस्त्यावरही हे तरुण मिळेल त्या जागी भर थंडीत पडून राहिले.    पावसाने मारलेली दडी, कमी झालेल्या नोकऱ्या आणि त्यातचं निघालेली टेरिटोरियल आर्मीची भरती प्रक्रिया यामुळे तरुणांची गर्दी झाली नसती तरचं नवल होते. लष्कराच्या मराठा लाईट इन्फ्रंट्री या प्रादेशिक सेनेच्या १०१ इन्फ्रंट्री बटालियनच्या माध्यमातून आजपासून १२ जानेवारीपर्यंत विविध १०९ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. या भरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून तरुण दाखल झाले असून त्यांना कोणत्याही सुविधेअभावी उघड्यावर रात्र काढण्याची वेळ आली आहे.    मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश अशा सर्व भागातून तरुण रविवारी पुण्यात दाखल झाली. थोडेथोडके नव्हे तर सात हजारांपेक्षा अधिक तरुण अवघ्या १०९ जागांसाठी घाम गाळत आहेत.इथे जवळपास कोणतीही खाण्याची सोय नसल्याने हे तरुण उपाशीपोटीराहून अडीच किलोमीटर पळत आहे. याबाबत एकाने लोकमतला सांगितले की, आम्ही माणसं आहोत, खाण्यापिण्याची नाही निदान स्वच्छतागृहाची तरी करायला हवी. गावाकडे आमच्याकडे खायला नाही आणि शहरात आम्हाला नोकरी नसल्याची हताश प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली. 

टॅग्स :Puneपुणेjobनोकरी