शहरं
Join us  
Trending Stories
1
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
3
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
4
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
5
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
6
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
7
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
8
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
9
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
10
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!
11
E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा...
12
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमातून का केली १ कोटींच्या कलशाची चोरी? समोर आलं भलतंच कारण!
13
आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार
14
नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का?
15
नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पंतप्रधानांचा राजीनामा, आंदोलकांनी संसद भवन पेटवले
16
रुग्णालयातील आपत्कालीन वॉर्डमध्ये महिला रुग्णावर बलात्कार; गुंगीचं इंजेक्शन दिलं अन्...
17
कोण आहेत बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
18
Video - स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही! पूरग्रस्त भागातील मुलाने जिंकलं मन, पाणी घेतलं अन्...
19
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
20
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले

पुणे महापालिकेच्या कोरोना सर्वेक्षणासाठी कागदोपत्री हजारो; पण फिल्डवर शेकडोच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 09:12 IST

प्रत्यक्षात फिल्डवर सध्या २५४ टीमच्या माध्यमातन केवळ ५०० जणच कार्यरत

ठळक मुद्देपरिसरातील नागरिकांना सर्दी, ताप, खोकला आदी लक्षण आहे त्यांची माहिती संकलित

नीलेश राऊत- पुणे : पुणे महापालिका पशासन राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे सध्या महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाबाधित व सशयित रुग्णांच्या निवासस्थान परिसरात जाऊन सर्वेक्षण, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृतीकरिता अहोरात्र काम करत आहेत.  हे कामे प्रभावीपणे करण्यासाठी आरोग्य खात्याबरोबरच पालिका प्रशासनाने अन्य खात्यातील सेवकवगार्ची हजारोच्या संख्येत नियुक्ती केली आहे. परंतु, या ना त्या कारणाने प्रत्यक्षात फिल्डवर सध्या २५४ टीमच्या माध्यमातन केवळ ५०० जणच कार्यरत आहे. त्यामुळे कोरोना संबंधित तातडीच्या कामास मनुष्यबळाची कमतरता भासत असून,  सुमारे आणखी अडीच हजार मनुष्यबळाची गरज आहे.     पुणे पालिकेकडून करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणात कोरोनाबाधित व्यक्ती राहत असलेल्या परिसरात १ ते ३ किमी अंतराच्या परिसरात प्राधान्याने सर्वेक्षण करून, परिसरातील नागरिकांना सर्दी, ताप, खोकला आदी लक्षण आहे त्यांची माहिती संकलित करण्यात येत आहे.  या पाहणीत ज्यांना सर्दी, खोकला, ताप आहे यांची वेगळी माहिती संकलित करून ती मुख्यालयास सादर करण्यात येते. पुणे महापालिकेच्यावतीने पल्स पोलिओच्या कामाकरिता संपूर्ण शहरात १ हजार ३५० टीम कार्यरत असतात. या पार्श्वभूमीवर कोरोना संबंधित सर्वेक्षण व जनजागृती तथा माहिती सकलित करण्यासाठी, पुणे महापालिका हद्दीतील दहा लाख ५०हजार घरापर्यंत पोहचण्यासाठी एक हजार पाचश टीमचे नियोजन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत या कामासाठीपालिकतील विविध खात्यातील एक हजार सवक वर्गाच्या नियुक्तीची ऑर्डर काढली गेली परंतु , त्यापैकी अनेकजण बाहेर गावी गेले आहेत तर अनेकांना बदल्या हव्या आहेत. या अडचणीला सामोरे जाताना अनेक प्रश्न आरोग्य खात्यासमोर उभे आहे. त्यातच ज्यांना या कामासाठी नियुक्ती दिली गेली. त्यात सेवानिवृत्तीला आलेल्यांची संख्या अधिक आहे. त्यापैकी अनेकांना बीपी, मधमुह व अन्य आजार असल्याने त्याना कोरोनाबाधितांच्या निवासस्थान परिसरात प्रत्यक्ष फिल्डवर पाठवण्यात धोका आहे. या कामातील अनेक महिला चाळिशीच्या आतील असून अनेकांना लहान मुले असल्याने त्यांनाही नियुक्त केलेल्या ठिकाणी पूर्णवेळ काम करणे कठीण झाले आहे. ..........

सर्वेक्षणासाठी वाहन व्यवस्था आवश्यक

पुणे महापालिकेच्या अनेक कर्मचाऱ्यांना सध्या सर्वेक्षणाच्या नियुक्त ठिकाणीजाण्यास पुरेशी वाहन व्यवस्था उपलब्ध नाही़ बस, रिक्षा व अन्य सार्वजनिक  वाहतुक सेवा बंद असल्याने, कर्मचाऱ्यांना स्वत:च्या गाडीचा वापर करावा लागत आहे. परंतु, स्वत:च्या गाडीवरून प्रवास करताना कर्मचाऱ्यांना मार्गावर बहुतांशी ठिकाणी पोलिसांकडून खबरदारी म्हणून अडविले जाते. पालिकेचे ओळखपत्र दाखविल्यावर पोलीसही त्यांना सहकार्य करतात व न अडवता पुढे पाठवितात. पण यामध्ये सर्वांचा वेळ खर्ची पडत असल्याने, सर्वेक्षणासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना विभागवार का होईना पालिकेच्या वाहन विभागाने पुरेशी वाहन व्यवस्था करून देणे जरूरी आहे.........

सर्वेक्षणामुळे २६७ जण घरीच विलगीकरण कक्षातपालिकेच्या आरोग्य खात्यातर्फ आजपर्यंत ३ लाख ३२ हजार ६७७ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे़ यामध्ये कोरोना संबंधित लक्षणे आढळून आलेल्या नागरिकांची वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घतली  अशा २६७ जणांना घरातच विलगीकरण कक्षात राहण्याच्या सूचना करण्यात आल्या असून, दहा व्यक्तींना नायडू हॉस्पिटलमध्ये, आठ व्यक्तीना लायगुडे हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले आहे़ तर एका व्यक्तीस सणस मदान येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आल आहे. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाHealthआरोग्यCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस