मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 23:48 IST2025-08-03T23:47:25+5:302025-08-03T23:48:08+5:30
पुण्यातील कोंढवा भागात शालेय मुलांचा सत्कार आणि बॅग वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना अमित ठाकरे यांनी हे विधान केले.

मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
"मी आज पालकांशी बोलायला आलो आहे. की तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत पाठवण्यासाठी घाबरू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत. मुलींवर हात टाकणाऱ्यांची हिंमत वाढली आहे. पण, जे मुलींवर हात टाकतात, त्यांचे हातपाय तोडून नंतर पोलिसांकडे दिले पाहिजे", असे विधान मनसे नेते अमित ठाकरे यांनी केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने पुण्यातील कोंढवामध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार आणि बॅग वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये बोलताना अमित ठाकरे यांनी हे विधान केले.
"मी आज पालकांशी बोलायला आलो आहे. कारण जे माझं स्वप्न होतं आणि जे तुमचंही स्वप्न आहे की, मुलगा-मुलगी शाळेत गेल्यावर ते सुरक्षित असावं. त्यांच्या आयुष्यात काही अडचणी नसाव्यात. महाविद्यालयात गेल्यावरही ते सुरक्षित असावेत. काहीही अडचण असेल, तर सोडवली पाहिजे", असे अमित ठाकरे म्हणाले.
हातपाय तोडून पोलिसांना द्या -अमित ठाकरे
"भीती काय असते हे मला माहिती आहे कारण माझा मुलगा शाळेत जाणार आहे. एक भीती असते की, मुलाला काही झालं, मुलीला काही झालं, तर पुढे काय? उशिरा फोन आला, तर पुढे काय? इकडे हिमंत वाढली आहे. त्यांचे हात पाय तोंडून त्यांना तुम्ही पोलिसांना दिलं पाहिजे", असे विधान अमित ठाकरे यांनी केले.
आपली सत्ता नाहीये, पण राज ठाकरे सत्तेत
"छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात आपण राहतो. त्या मुलांचे हात पाय तोडून आपण त्यांना पोलिसांकडे दिलं पाहिजे. हे राज्य असं नाहीये की, आपण मुलींवर हात टाकू शकतो. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की, शाळेत जर पाठवत असाल... महाविद्यालयात पाठवत असाल... आपली सत्ता नसेल, तरी राज साहेब सत्तेत आहेत", असे अमित ठाकरे यावेळी म्हणाले.